Wednesday, April 15, 2020

पंचायत समिती, वीज कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप

जत तालुका सरपंच परिषदेचा उपक्रम

(जत येथील वीज वितरण कर्मचाऱ्यांना सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्याहस्ते सॅनिटायझर वाटप करण्यात आले.)
जत,( प्रतिनिधी)-
 कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जत तालुका शाखेच्यावतीने पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क व वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी जत पंचायत समिती गटविकास अधिकारी
अरविंद धरणगुत्तीकर, सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, कुंभारीचे सरपंच राजाराम जावीर, बसर्गीचे
(जत पंचायत समितीच्या अधिकाऱयांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.)
उपसरपंच किशोर बामणे, विस्तार अधिकारी मनोज जाधव, श्री. संकपाळ, वीज मंडळाचे सुनिल माने, सुनिल बंडगर, महेश शिंदे, महालिंग माळी यांच्या सह पंचायत समिती व वीज मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी सांगितले की, जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे सांगून सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment