Monday, April 13, 2020

बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला अटक

17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सनमडी येथील पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सतीश अंकुश कांबळे या शिक्षकाला उमदी पोलिसांनी अटक केली . घटनेनंतर हा शिक्षक फरारी झाला होता. सतीश कांबळे याला  जिल्हासत्र न्यायालयात काल हजर करण्यात आले . न्यायालयाने कांबळेला शुक्रवार  ( ता . १७ ) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  शनिवारी दुपारी आरोपी सतीश कांबळेने अल्पवयीन पिडीत मुलीस दमदाटी करून जवळच असलेल्या प्राथमिक शाळेत  तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला . पीडित मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तो पळाला . परवा रात्री उशिरा त्याला उमदी पोलिसांनी अटक केली . काल (सोमवारी) न्यायालयात हजर केले . शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे . पोलिस तपास करीत आहेत.दरम्यान, गुरुवारी दुपारी त्याने या अल्पवयीन मुलीस आपल्या घरात ओढून नेऊन बलात्कार केला होता.

No comments:

Post a Comment