Sunday, April 5, 2020

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४८ वर

मुंबई,(प्रतिनिधी)-
मुंबईत कोरोनाचे  काल ८१ नवे रुग्ण आढळून आले. मुंबईसह राज्यात वाढलेल्या संख्येमुळे  राज्यातील एकूण संख्या ७४८वर गेली आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. काल दिवसभरात मुंबईत ८१ नवे करोनाबाधित सापडले. तर राज्यात आज एकूण ११३ करोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७४८वर आणि मृत्यूसंख्या ३६ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात (महापालिकानिहाय) मुंबई ८१, पुणे १८, औरंगाबाद ४, नगर ३, कल्याण-डोंबिवली २, ठाणे २, उस्मानाबाद १, वसई १ आणि इतर भागात १ असे एकूण ११३ रुग्ण सापडले.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाहीत. राज्यात गेल्या १६ तासांत ५५ नवे करोना रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७४८ वर गेली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. राज्यात काल पुण्यात सर्वाधिक १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये ३, औरंगाबादमध्ये दोन आणि मुंबईत २९ रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७४८वर गेली आहे. यात मुंबईत एकट्या धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. तर पुण्यात दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ३४वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापयर्ंत एकूण ५२ रुग्ण बरे झाले आहेत.
औरंगाबादमध्ये काल पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. हे पाचही जण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वर्षाच्या आणि ७ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकार्‍याच्या चालकालाही कोरोनाची लागण झाल्याने औरंगाबादच्या शासकीय कर्मचार्‍यांमध्ये चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल दोन कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा कळविण्यात आले. त्यात ४५ वर्षीय महिला आणि ३८ वर्षीय पुरुष ( राहणार अनुक्रमे - आरेफ कॉलनी आणि बीड बाय पास) यांचा समावेश आहे. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment