Sunday, April 19, 2020

प्रकाश जमदाडे यांचेतर्फे मास्क व सॅनिटीझर वाटप

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील निगडी, काराजनगी, घोलेश्वर, सनमडी, कुनीकोनूर, टोणेवाडी आणि खैराव या गावामध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी गरजू लोकांना मास्क व सॅनिटीझर वाटप केले.

 त्याचबरोबर गावामध्ये रेशन धारकांना स्वस्त धान्य दुकानात गहू तांदूळ योग्य दरात व योग्य प्रमाणात, गावातील पिण्याची पाण्याची सोय , आरोग्य कर्मचारी यांनी गावामध्ये तपासणी व निर्जंतुकीकरण केले आहे का, याविषयांबाबत चौकशी केली.
कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये याची काळजी घ्यावी तसेच काही त्रास असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी, लोकांनी घरीच रहावे सुरक्षित राहावे, काही अडचण असेल तर मला कळवा मी तुम्हास मदत करणेचा प्रयत्न  करेन असे, आव्हान यावेळी प्रकाश जमदाडे साहेब यांनी केले. कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी  मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधीकारी, पोलीस अधीक्षक, जतचे प्रांत साहेब, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकारी व या सर्व कार्यालयाचे कर्मचारी वर्ग व अत्यावश्यक सेवा देणारे सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम लोकांची गरज व आवश्यकता ओळखून मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment