Sunday, April 5, 2020

जत तालुक्यात गरज असेल तिथे टँकर द्या

मंत्री जयंत पाटील
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, गाव व वाड्या-वस्त्यावर लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, शिवाय संचारबंदी लागू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दयावी या मागणीची सांगलीच्या पालकमंत्र्यांनी दाखल घेत जत तालुक्यात गरज असेल त्या गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करा, असे आदेश मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत, जतमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत
पाटील यांनी तालुका प्रशासनाचा आढावा घेतला.
यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह आधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील यांनी जत तालुक्यातील प्रशासनाला पाणी टंचाईकडे लक्ष देण्याची सूचना केली, दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाच्या साखळीला लवकरच ब्रेक लागेल. तर नागरिकांना अत्यावश्यक सेवेची कमतरता भासू देणार नाही. शेतकऱ्यांच्या मालासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये,असेही ते म्हणाले, आ. विक्रम सावंत यांनी संचारबंदी लागू असून पूर्व भागासह जत हद्दीत दारूचे गुत्ते सुरू आहेत. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे करण्याचे सांगितले. त्यामुळे पालंकमंत्र्यांनी अल्कोहोलमुळे कोरोना
विषाणूंच्या प्रादुर्भाव होत नाही, असा गैरसमज समाजात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलिसांनी ही यावर कारवाई करावी, असे आदेश दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. चन्नाप्पा होर्तीकर यांनी अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. त्या सुरू ठेवण्याची मागणी केली, यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी तालुक्यात 14 हजार 400 लोक दाखल झाले होते. 23 परदेशी प्रवासी आहेत. यापैकी 12 जणांचा होमकॉरेंटाईन कार्यकाळात पूर्ण झाला आहे. 16 लोक इस्लामपूर येथे गेले होते. त्यांना दरीकोणूर, घोलेश्वर येथे ठेवण्यात आले आहे. दहा रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यापारी, डॉक्टर,भाजीपाला व्यापारी मेडिकल पेट्रोल पंप सर्वांच्या बैठका घेऊन शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जात असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment