Sunday, April 19, 2020

सांगलीमध्ये कोरोनाचा पहिला बळी;जिल्हा हादरला

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्हा कोरोना संसर्गाच्या मुक्तीच्या दिशेने निघाला असताना एका सहकारी बँकेत कर्मचारी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सांगली शहरासह जिल्हाच हादरून गेला आहे. ही व्यक्ती सांगलीतील विजयनगरमधील आहे.  धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने गेल्या महिन्याभरात परदेश वारी किंवा इतर राज्यातही गेली नसल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला बँकेच्या माध्यमातून संसर्ग झाला आहे का याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासह 27 जणांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.त्यांची तपासणी करण्यात आली आहे. अजून अहवाल प्रतीक्षेत आहे. कोरोना बाधित व्यक्ती विजयनगर येथे राहत होती तर गणपती पेठेतील एका सहकारी बँकेच्या शाखेत काम करत होती.दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्यावर एका खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली. त्यांना न्यूमोनिया ची लक्षणे असल्याने शुक्रवारी (दि.17 ) मिरजेच्या कोविड-19 या कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा :स्वब' तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.   त्याचा अहवाल रविवारी रात्री साडेबारा च्या सुमारास प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्रकृती बिघडत चालली. सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान,कोरोना रुग्ण ज्या परिसरात राहत होता,त्या विजयनगर परिसरातील एक किलोमीटर एरिया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 55 ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. येथे फक्त सिंगल एन्ट्री ठेवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या भागातून कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंब,नातेवाईक, सहकारी असे 27 जण हायरिस्क असून त्यांना आयसोलेशन कशात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. इतर 43 जणांना इन्स्टिट्युशनल कवारांटाईन करण्यात आले आहे. खासगी डॉक्टरासही आयसोलेशन कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तो कर्मचारी ज्या बँकेत कामाला होता ती बँक सॅनिटायझरने धुवून काढण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment