Thursday, April 2, 2020

जाडरबोबलाद येथे देशी दारू अड्ड्यावर छापा

28 हजारांचा मुद्देमाल जप्त
जत,(प्रतिनिधी)-
जाडरबोबलाद ता.जत येथे जत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकून विदेशी दारू, देशी दारू व हात भट्टीवर छापा टाकून 28 हजार 310 रुपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यावेळी जाडरबोबलाद येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण अद्याप फरार आहेत.

जाडरबोबलाद येथे बुधवारी दुपारी जत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तीन ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीर विदेशी दारू , देशी दारू व हातभट्टी साठा जप्त करण्यात आला .जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष कांबळे , सुनील व्हनखंडे, विजय अकुल, वाहीदअली मुल्ला, सुरेश माळी, माडग्याळ औट पोस्टचे पोलीस हवालदार बसवराज कोष्टी , विक्रम गोदे यांच्या पथकाने जाडरबोबलाद येथे बेकायदेशीर परवाना विदेशी दारू देशी दारू व हातभट्टी विक्री करणाऱ्यावर छापा टाकून 28 हजार तीनशे दहा रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment