Monday, April 13, 2020

बाजमध्ये बेकायदा देशी दारू विक्री अड्ड्यावर छापा

एक लाखाच्यावर मुद्देमाल जप्त 
जत,(प्रतिनिधी).
 कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन असतानाही जत तालुक्यात बेकायदा दारू विक्री करण्याच्या घटना आहेत. आज जत तालुक्यातील बाज येथे देशी दारू विक्री करणाऱ्या एका अड्ड्यावर च्या बाटल्या सुमारे 1 लाख रुपयांच्यावर किंमतीची दारू जप्त करण्यात आली.
 ही कारवाई जत उत्पादन शुल्क विभागाच्या जत दुय्यम निरीक्षक कार्यालयाने केली.

आरोपी नितीन दादासो गोरे (वय वर्षे 32) उत्पादन शुल्कने छापा टाकत बाज (ता.जत, जि.सांगली) याच्याकडे छापा टाकून देशी दारूची 41 बॉक्स
मुद्देमाल देशी संत्रा दारू -355 लीटर दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत सुमारे एक लाख दोन हजार 336 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उत्पादन शुल्क सांगलीचे अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जतचे निरीक्षक संजय वाडेकर,उमेश निकम, रणधीर पाटील, भरत सावंत, रणधीर पाटील, स्वप्नील कांबळे आदींनी केली.

No comments:

Post a Comment