Thursday, April 9, 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिकारी,पदाधिकारी आणि कर्मचारयांचे ऑनलाइन प्रशिक्षण

जत,(प्रतिनिधी)-
कोरोना विषाणू ( कोविड - 19 ) उदभवलेल्या परिस्थितीत जनजागृती करणेकामी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये  अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 17 एप्रिल दरम्यान हे प्रशिक्षण सर्व तालुक्यात एकाच दिवशी दोन टप्प्यात होणार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणू ( कोविड- 19 ) चा प्रसार जलद गतीने होत आहे . त्यामुळे लोकांमध्ये सदर रोगाबाबत भिती निर्माण झालेली आहे . त्यामुळे कोरोना विषाणू ( कोविड - 19 ) बाल प्रबोधन व जनजागृती करणेकामी जिल्हा परिषद सांगली मार्फत ऑनलाईन ( VC ) द्वारे प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आलेले आहे . सदर प्रशिक्षणासाठी  सर्व गट विकास अधिकारी यांनी आपले तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य , ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य  , ग्रामपंचायत कर्मचारी , अंगणवाडी सेविका व मदतनीस, साधन व्यक्ती , शिक्षक व केंद्रचालक यांना सादर प्रशिक्षणाबाबत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने लॅपटॉपची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने इंटरनेटची सुविधा उपलब्ध करावी,  प्रशिक्षणा दरम्यान हॉलमध्ये दोन व्यक्तींमधील अंतर कमीकमी एक मिटर असावे असे सांगण्यात आले आहे.  सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

No comments:

Post a Comment