Wednesday, April 15, 2020

जत नगरपरिषदेमार्फत जत शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप


जत (प्रतिनिधी)-
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील दिव्यांगांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अडचणी येऊ नयेत म्हणून  सुमारे 96 दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे दोन लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना व्हायसचा शहरात संसर्ग होऊ नये, म्हणून पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णाचा वाढीव आकडा लक्षात घेता सध्या संपूर्ण जगभरात भितीचे वातावरण पसरले असुन जत नगरपरिषदेतर्फे जत शहरातील नागरीकांना कोरोना वायरस संबंधी सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे.आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुणे, हस्तस्पर्श टाळणे. सार्वजनिक ठिकाणी वस्तूंचा संपर्क टाळणे, हस्तांदोलन करण्याऐवजी भारतीय नमस्कार करण्यास प्राधान्य देणे एकमेकांशी संवाद साधताना किमान १ मीटर अंतर ठेवणे अशा  सूचना दिल्या जात आहेत तसेच उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच जत नगरपरिषदेतर्फे संपूर्ण शहरात सोडियम हायपोक्लोराईट (विषाणू प्रतिबंधक) या केमिकलचा वापर करुन संपूर्ण शहारत फवारणी केली जात असुन सार्वजनिक ठिकाण (उदा. बस स्टॅन्ड, मुख्या बाजार पेठ, सरकारी कार्यालये) येथे निरजंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर याचाच एक भाग म्हणून जत शहरातील दिव्यांग लोकांना त्यांच्या दैनंदीन गरजा भागवण्यात अडचणी येऊ नये याकरिता जत नगरपरिषदेमार्फत जत शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना सन २०२०-२०२१ या वर्षातील निधीमधून एकूण ९६ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी रक्कम रु. २हजार २०० प्रमाणे एकूण  रु. २लाख ११हजार २०० रूपये इतका निधी वाटप करण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment