Wednesday, April 8, 2020

आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांनी तपासणी करून घ्या

जत,(प्रतिनिधी)-
ग्रामीण भागात ताप,खोकला,श्वास घेण्यास अडचण असणारे नागरिक तसेच मुंबई, पुणे किंवा परजिल्ह्यातून 1मार्च नंतर तालुक्यात आलेल्या नागरिकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यांची तपासणी झाली नाही,त्यांनी तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 02344- 248269 या फोन क्रमांकावर संपर्क साधण्यास कळविले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रिनिंग (समुदाय तपासणी) ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत ताप,खोकला,श्वसनासाठी अडचण येत असलेले नागरिक व मुंबई, पुणे किंवा परजिल्हा,राज्यातून 1 मार्चपासून सांगली जिल्ह्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर दिला जातो आहे. अशा नागरिकांनी तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. याबाबत सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या नियंत्रणा च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तीन उपजिल्हा रुग्णालये, 12 ग्रामीण रुग्णालये, 59 प्राथमिक आरोग्य केंद्रे 'स्क्रिनिंग सेंटर्स' म्हणून कार्यान्वित करण्यात आली आहेत. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयकडील वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी हे या 'स्क्रिनिंग सेंटर्स' चे प्रमुख आहेत. इथे येणाऱयांची प्राथमिक तपासणी करणे,स्थानिकासह पुणे,मुंबई व विदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये लक्षणे आढळल्यास तपासणी करणे, त्यांची तपासणी पॉझिटिव्ह आल्यास मिरजेतील शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्याचे निर्देश आहेत.

No comments:

Post a Comment