Tuesday, April 7, 2020

एकुंडी ग्रामपंचायतकडून सॕनीटायझर व हँडवॉशचे वाटप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायतकडून हँड सॕनीटायझर व हँडवॉशचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर खबरदारी म्हणून विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातदेखील विविध उपाय योजना ग्रामीण प्रशासनाकडून राबविले जात आहेत. एकुंडी ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व जनतेला सॕनीटायझरचे वाटप केले आहे.
जत तालुक्यातील एकुंडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर, हँडवाश, साबण व मास्कचे वाटप करण्यात आले.
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तथा जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लॉकडाऊनमुळे शहरात जाता येत नसल्यामुळे येथिल ग्रामस्थांची अडचण ओळखून ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्यावतीने या साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक व पदाधिका-यांनी घरोघर जाऊन वाटप केले.
यावेळी उपसरपंच सरोजिनी कोरे,ग्रामसेवक आर.के.माळी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment