Monday, April 20, 2020

विजयपुरात एका दिवसात अकरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले

रुग्णांची संख्या झाली 32; प्रशासन आणखी अलर्ट
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
विजयापुरात सोमवारी (ता.20) एका दिवसांत तब्बल अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 32 झाली आहे.दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सायंकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सात वर्षांची मुलगी, दहा आणि चौदा वर्षांची दोन मुले,28 आणि 36 वर्षांचे दोन युवक, 21 युवती, 27, 34, 38  आणि 47 वर्षांच्या चार महिलांचा समावेश आहे.
यामुळे कोरोना बाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे.  अगोदरच यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तीस जणांना विजयापुरातील सरकारी दवाखान्यातील आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. विजयपुरात पहिल्या महिला कोरोना बाधित रुग्णामुळे यातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात सर्वत्र कोरोना संसर्ग थैमान घालत असताना विजयापुरात मात्र ता. 12 पर्यंत एकही रुग्ण नव्हता मात्र त्याच दिवशी सायंकाळपर्यंत सहा रुग्ण आढळून आले. तर ता.16 रोजी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे विजयपूर प्रशासन हादरून गेले आहे.प्रशासन सतर्क असतानाच आणि लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली जात असताना सोमवारी (ता.20) अचानक अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या आठ दिवसांतच रुग्णांची संख्या 32 वर पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. विजयापुरातील हे रुग्ण स्टेशन रोड, गोलघुमट समोरील परिसरातील आहेत. प्रशासनाने हा सर्व परिसर लॉक डाऊन केला आहे.

No comments:

Post a Comment