Friday, April 17, 2020

माडग्याळमध्ये पाच दिवस लॉकडाऊन

माडग्याळ ,(जत न्यूज  वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जत तालुक्यातील माडग्याळ येथे सलग पाच दिवसांसाठी पूर्णत : लॉकडाऊन करण्यात आले आहे . जत तालुक्यात उमदी, जाडर बोबलाद यांसह अनेक गावांनी स्वतःला लॉक करून घेतले आहे. सोलापूर व कर्नाटकातील विजापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत . त्यामुळे दक्षता  म्हणून माडग्याळचे  सरपंच इराण्णा जत्ती , ग्रामसेवक अशोक चव्हाण , उपसरपंच आबांना माळी व सर्व सदस्य यांनी गावातील व्यापारी , ज्येष्ठ नागरिक यांच्याशी सल्ला व चर्चा करून माडग्याळमध्ये मंगळवारपर्यंत  पाच दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता " आकडा लक्षात घेऊन तसेच माडग्याळ व परिसरातील गावातून बाहेरुन प्रवासी , नागरिक तसेच ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात ' आल्यामुळे कोणीही त्यांच्या संपर्कात येऊ नये , यासाठी पाच दिवसांसाठी पूर्णत : लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या पाच दिवसात सर्वच दुकाने , किराणा दुकाने आणि भाजीपालाही बंद असणार आहे . फक्त दवाखाने , औषध दुकाने व दूधपुरवठा सुरू  असणार आहेत . त्यामुळे नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये , प्रशासनाला सहकार्य करावे , अशी विनंती सरपंच इराण्णा जत्ती यांनी केली आहे .

No comments:

Post a Comment