Saturday, April 4, 2020

आमदार सावंत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले एक लाख

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याचे आमदार विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिला एक लाखाचा धनादेश  दिला.            कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व  त्याचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आव्हान केले होते.  त्या आव्हानास प्रतिसाद म्हणून आमदार विक्रम दादा सावंत यांनी एक लाखाचा धनादेश राज्यमंत्री विश्वजीत  कदम यांच्या उपस्थितीत तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.

 केंद्र शासनासह महाराष्ट्र शासन कोरोनाच्या संकटाला धैर्याने आणि कौशल्याने सामना करत आहे .या प्रयत्नांना साथ देण्यासाठी देशासह  महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, संस्था, खेळाडू, यासह सर्व स्तरातून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करीत आहेत. या मदतीला आमदार विक्रम सावंत यांनी साथ देत एक लाखाचा धनादेश सुपूर्त केला. एवढेच न करता जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मास्क वाटप ही त्यांनी केले आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम दादा सावंत हे  सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

No comments:

Post a Comment