Sunday, May 31, 2020

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करा आणि देश आत्मनिर्भर बनवा -सोनम वांगचुक

भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले आहे. २0१८ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणार्‍या वांगचुक यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामधून त्यांनी भारतीय खूप मोठय़ा प्रमाणात चीनला प्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत असतात असे म्हटले आहे. एकीकडे भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळुरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.

सांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधित

सद्यस्थितीत उपचाराखाली ४५ रूग्ण- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

सांगली दि. 31( जत न्यूज वृत्तसेवा)-
 सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 45 झाली आहे. आज अखेर 63 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 112  रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी एका रुग्णांची स्थिती चिंताजनक असून  तिघांची स्थिती स्थीर आहे. आज चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

कवी महादेव बुरुटे : उभं आयुष्यच लाॅकडाऊन

ध्यानीमनी नसताना भारतात कोरोना व्हायरस ने छुपा प्रवेश केला आणि त्याच्या विघातकतेमुळे माणसांचं जगणंच सावधगिरीचा उपाय म्हणून लॉकडाऊन झालं. पायाला आधुनिकतेची चक्रं बांधलेल्या सर्वांना घरात कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे. पण ही वेळच अशी आहे - आपल्यासाठी, घरच्या लोकांसाठी, आपल्या लाडक्या मुलाबाळांसाठी हे आज गरजेचे आहे. चाळीस एक दिवस ही अवस्था अनुभवत असताना लोकांना बांधून घातल्यासारखे झाले आहे. पण उभं आयुष्यच ज्याच्या नशिबी लॉकडाऊन आहे त्यांचं काय? असेच आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व  ध्येयनिष्ठेने वाटचाल करीत आपलं असह्य जीवन विविध लोकोपयोगी, समाजाभिमुख मार्गानी सुसह्य करीत हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे  शेगांव येथील कवी, साहित्यिक महादेव बुरुटे.

शाहू आश्रमाशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे सेवानिवृत्त


( सिद्धार्थ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार  उमाजीराव सनमडीकर व सचिव डॉ.  कैलास सनमडीकर व संचालिका डॉ.  सौ. वैशाली सनमडीकर यांच्या हस्ते  श्री. कारंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.)
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ ,सनमडी (ता.जत) संचलित  जत येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक  आश्रमशाळा जत या शाळेतील  मुख्याध्यापक  राजेंद्र मारुती कारंडे यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार  31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल त्यांना संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी व संचालक मंडळ व सर्व शाखेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून त्यांना त्यांच्या भावी आयुष्य निरोगी, आरोग्य संपन्न व आनंदी, सुखी जावो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

Saturday, May 30, 2020

आधी मोबाईल, मग शाळा

मुलांचा हट्ट; ऑनलाइन शिक्षणाचा प्रभाव
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दोन  महिन्यांपासून देशात टाळेबंदी आहे.  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  मार्च महिन्यातच शाळा बंद केल्या.  द्वितीय सत्राच्या परिक्षा रद झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू  नये, यासाठी राज्यात ऑनलाईन  शिक्षण देण्याचा उपक्रम शासनाने  सुरू केला आहे. याचा परिणाम आता गावखेड्यात बघायला मिळत आहे.  पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी पालकांची मोबाईल दुकानात गर्दी बघायला मिळत आहे. पहिले मोबाईल  नंतर शाळा अशी अवस्था सर्वत्र आहे. शिक्षणापासून  टाळेबंदीतही शैक्षणिक कार्य  सुरू रहावे, यासाठी शिक्षण विभागाने  उपाययोजना केली आहे.

Friday, May 29, 2020

उत्तम प्रशासक :मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे

सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी संचलित राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे हे 31 मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. संस्थेची मुहूर्तमेढ लावलेल्या श्री . कारंडे सरांनी  आपल्या कामांतून संस्थेच्या विस्ताराला मोलाचा हातभार लावलाच शिवाय तालुक्यात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या तालुक्यातील भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.

सांगली जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोना बाधित

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी
सांगली दि.३० (जत न्यूज वृत्तसेवा)-
जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोणाबाधित झाले असून यामध्ये औंढी तालुका जत येथील 55 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे .सदर व्यक्ती 16 मे रोजी मुंबईहून आलेली आहे .खानापूर तालुक्यातील कारंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून सदर व्यक्ती 18 मे रोजी मुंबईहून आलेली आहे.

सांगली जिल्ह्यात आज नव्याने कोरोणा बाधित रुग्ण नाही

तर एक जण कोरोणामुक्त
सांगली दि. 29 (जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण एकही नाही . तर एक जण कोरोणा मुक्त झाला आहे . उपचारा खालील रुग्णांची संख्या तीन आहे .तर आज अखेर कोरोणा मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 55 झाली आहे. आज आखेर  तीन कोरोणा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 101 एकूण कोरोणाबाधित ठरले आहेत . यापैकी तीन रुग्णांची संख्या चिंताजनक आहे . सध्य स्थितीत प्राप्त रिपोर्टनुसार आज एकही नवीन बाधित रुग्ण नाही. सोहली तालुका कडेगाव येथील 54 वर्षे पुरुष कोरोना मुक्त झाला आहे.

ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने राज्य व महानगरातील कामगार मजूर वर्ग स्वगृही परतले आहेत. ग्रामीण भागातील कामधंदेसुद्धा लॉकडाऊनमध्ये बंद असल्याने हाताला कामे नाहीत. यामुळे उपजीविकेची मोठी समस्या निर्माण झाली आहे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.

सांगलीत दक्षिण शिवाजी नगरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली शहरातील  दक्षिण शिवाजीनगर (प्रभाग क्रमांक 17) मध्ये नुकतेच शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे.

जैवविविधतेचे संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी: डॉ. दांगट

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे. पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत. शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. भाऊराव दांगट यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने  "जैवविविधता व तिचे संरक्षण" या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेबीनारमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.

Thursday, May 28, 2020

मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज माफ करा - विजय ताड

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश २३ मार्च पासून लॉकडाउन मध्ये आहे.महाराष्ट्रातदेखील लॉकडाउन चालू आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत.त्यामुळे गोरगरीब व गरजू महिलांनी आपला उद्योग व्यवसाय आणि घर प्रपंच चालवण्यासाठी जत शहरात असणाऱ्या भारत फायनान्स , स्पंदना फायनान्स ,आर बी एल आणि ग्रामीण कोटा व अन्य फायनान्स कंपन्याकाडून छोट्या मोठ्या स्वरूपात कर्जे घेतले आहेत.त्यांचे हप्ते साप्ताहिक,पाक्षिक व मासिक स्वरूपाचे आहेत.ते सर्व कर्जे शासन स्तरावरून माफ करावे, अशी मागणी जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे .

Tuesday, May 26, 2020

जतमध्ये हॉटेल कामगाराचा शॉक लागून मृत्यु

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरातील धाणेश्वरी कॉलनीत राहणारा हॉटेल कामगार सुभाष म्हाळाप्पा तेली (वय 35) याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली.
तेली हा मूळचा कराड येथील राहणारा आहे. कामानिमित्त तो गेली काही वर्षे जत येथे राहात होता. एका परमिटरूम ,बारमध्ये वेटर म्हणून तो कामाला होता. आज सकाळी (मंगळवारी) राहत्या घरासमोर नळाला पाणी आल्याने व पाणी कमी दाबाने येत असल्याने मोटर लावण्यास गेला असता विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.अधिक तपास सुरू आहे.

Monday, May 25, 2020

अफवा पसरवल्यास गुन्हा: आवटे

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
शहरातील त्या तरुणाचा मृत्यू कोरोनाने झाला नसून त्याच्यात कोणतेही लक्षण आढळले नाही. त्याच्या शरीरात काविळ व रक्ताचे प्रमाण कमी होते. म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे. तरीही प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आई व वडील यांच्यासह सहा जणांना क्वारंटाईन केले जाईल.मात्र, याबाबतची खात्री न करता सोशल मीडियावर कोरोनामुळे तरुणाचा  मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवली. अधिकृत माहिती असल्याशिवाय सोशल मीडियावर अशा खोट्या अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करू, असा इशारा जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी पत्रकार बैठकीत दिला.

शेतकऱ्यांचे सहा महिन्याचे विज बिल माफ करावे

विकास साबळे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जगभर कोरोना महामारीचे संकट ओडविले आहे. त्यामुळे मार्चपासून देशभर लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहेत. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या आशेवर भाजीपाला, फळबागा व इतर पिकांची लागवड केली होती.उत्पन्नही बऱ्यापैकी आले होते.मात्र लॉकडाऊनमुळे बाजार समित्या, आठवडे बाजार बंद असल्यामुळे माल पडून राहिला, त्यांची विक्री झाली नाही.

सांगली जिल्ह्यात आज नवीन तीन रुग्ण कोरोनाबाधित

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी
सांगली दि.25 (जत न्यूज वृत्तसेवा)-
 सांगली जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये झोळंबी (आष्टा तालुका -वाळवा) येथील दि. 23 मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची  पत्नी (वय 25वर्ष) कोरोना बाधित झाली आहे. तसेच कामत (खरसुंडी जवळ, तालुका- आटपाडी) येथील 65  वर्षीय पुरूष दि. 23 मे रोजी मुंबईहून आलेले होते. सदरची व्यक्ती कोरोनाबाधित ठरली आहे.

Sunday, May 24, 2020

सलून दुकान बंदमुळे टक्कल हाच पर्याय

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूच्या प्रादरुभावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सलून दुकान बंद असल्यामुळे डोक्यावर वाढलेले केस कापण्यासाठी वारंवार केस कापण्यापासून मुक्तता व्हावी म्हणून काहींनी टक्कल हाच पर्याय शोधला असल्याचे जतमध्ये चित्र आहे.

सांगली जिल्ह्यात आज आणखी चौघे कोरोणा बाधित

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा) -
सांगली जिल्ह्यात 82 रुग्ण कोरोणा बाधित असून यामध्ये आज नवीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत उपचाराखाली 34 रुग्ण आहेत . यामध्ये आज चार रुग्ण नवीन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत‌. आतापर्यंत 46 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून यात आज कोरोणामुक्त झालेल्यांची संख्या ३ आहे.

Saturday, May 23, 2020

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सावकारांचा बंदोबस्त करू

स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे 

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 जिल्ह्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत चार दिवसापूर्वी कदमवाडी येथील शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली ,हे दुर्दैवी आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्रास देणाऱ्या सावकाराची माहिती आम्हाला कळवावी आम्ही सावकाराचां बंदोबस्त करू असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

जि.प. आणि पं. स. कर्मचार्‍यांच्या अखेर बदल्या रद्द

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या मे महिन्यात करण्यात येतात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासन व यंत्रणा अत्यंत व्यस्त असल्यामुळे यावर्षी मे महिन्यात होणार्‍या जि. प. ,प.स. कर्मचार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करून प्रशासकीय बदल्यांवर होणारा ५00 कोटींचा खर्च कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची वळता करण्याची मागणी विविध संघटनांकडून ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीस राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रतिसाद दिला असून, १९ मेच्या पत्रानुसार आता जि. प. कर्मचार्‍यांच्या यावर्षीच्या अर्थात २0२0 मध्ये बदल्या होणार नाहीत, हे स्पष्ट केले आहे.

Friday, May 22, 2020

वाळेखिंडीतील नऊ जण इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन

गाव 14 दिवस बफर झोनमध्ये
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे  एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने  त्या रुग्णाच्या घरातील 9 व्यक्तींना जत येथे 'इन्स्टिट्यूटशनल क्वारंनटाईन' ठेवण्यात आले आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे मुंबईहुन आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेनंतर गुरुवारी रात्री आरोग्यअधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, यांनी गावाला तातडीने भेट दिली. शुक्रवारी गावातील सरपंच,पोलिस पाटील व इतर पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.

जीवनात परीक्षा हेच अंतिम ध्येय नव्हे

प्राचार्य डॉ.व्ही.एस. ढेकळे
राजे रामराव महाविद्यालयात 'नैराश्यावर बोलु काही'  कार्यक्रम

जत ,(प्रा तुकाराम सन्नके)-
परीक्षा जवळ आली की, कित्येक विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. या भीतीतूनच स्वत:च्या प्रयत्नावर व क्षमतेवर शंका निर्माण होऊन, यातून न्यूनगंड व नैराश्य जन्माला येते. जर या भीतीचं रूपांतर नैराश्यामध्ये झाले तर तो विद्यार्थी प्रयत्नशून्य बनतो. यालाच टेन्शन असे म्हणतात. अशावेळी त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांच्यात आत्मिक बळ निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले.

रेशनकार्ड नसलेल्या मजूरांना मिळणार मोफत तांदूळ

जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्रशासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्र सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या बिना शिधापत्रिका धारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कलावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ बितरण करण्यात येणार आहेत,अशी माहिती जत नगर परिषदेने दिली आहे.

जत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरीत पुर्ण करा

डॉ. मनोहर मोदी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरातून जाणा-या विजापूर -गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जत साखर कारखान्याचे माजी संचालक, जत अर्बन बँकेचे सर्वेसर्वा व जत शहरातील ज्येष्ठ जनरल सर्जन डॉ. मनोहर मोदी यांनी केली आहे.

Thursday, May 21, 2020

सांगली जिल्ह्यात दिवसभरात ८ जण कोरोणा बाधित

वाळेखिंडीत एक रुग्ण आढळला; भिकवडीतील वृद्धाचा मृत्यू 
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात ८ जण कोरोना बाधित झाले असून यापैकी कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील 65 वर्षीय कोरोणाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती मुंबईवरून दिनांक 17 मे रोजी जिल्ह्यात आली होती. त्यांना मधुमेह , रक्तदाबाचा विकार होता‌. दरम्यान, जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे एक 32 वर्ष वयाचा रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे जत तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 3 झाली आहे.

खरीपपूर्व मशागतींची धांदल सुरू

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या सांगली जिल्ह्यात खरीपसाठी मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याच्या वार्तेने मशागती कामांची धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शेत मशागतींच्या कामांना विलंब झाला होता. दरम्यान यंदा खते शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधवरच उपलब्ध केली जाणार आहेत.

Tuesday, May 19, 2020

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधित

जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी 
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा) -
रेड ता.शिराळा येथे मुंबईहून दिनांक 17 मे रोजी  42 वर्षीय महिला आली होती . सदर महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आले होते . लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल मिरज आयसोलेशन कक्षाकडे संदर्भित केले होते. या महिलेचा आज कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात आता फक्त दोन झोन

 रेड झोन वगळता दुसऱ्या झोनमध्ये काही निर्बंध शिथिल

चौथ्या लॉकडावूनच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, (प्रतिनिधी)-
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी ‘रेड झोन’मध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत.

कोरोना काळात "लॉ ऑफ लव्ह" च्या फर्स्ट लूक चे डिजिटली अनावरण

लॉकडाऊनचा परिणाम अर्थात आपल्या चित्रपटसृष्टीला देखील बसला आहे, वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यातून थांबवण्यात आले, चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रोमोशन रखडले आहेत. आणि याच वेळेचा सदुपयोग करत एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय  रसिकप्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट "लॉ ऑफ लव्ह" घेऊन येत आहेत. सध्या डिजिटली जास्तीत जास्त लोकं "ऍक्टिव्ह" असल्याने निर्मात्यांनी याच वेळेला आपली संधी मानत "लॉ ऑफ लव्ह" च्या फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण सोशल मीडियावर केलं  आणि या पोस्टर ला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे.

रावळगुंडवाडीत पावणे चार लाखाचे चंदन जप्त

उपविभागीय पोलीस कार्यालयाची कारवाई 
(फाईल फोटो)
जत, (जत न्यूज वृत्तसेवा) -
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे 106 किलोच्या चंदनाची झाडे तोडून व त्याचे लाकूड विक्रीसाठी विनापरवाना साठा करून ठेवल्याप्रकरणी  जत उपविभागीय पोलिस आधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून  पकडले आणि  3 लाख 71 हजार रुपयांचा चंदन लाकडाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत आज  मंगळवारी  रावळगुंडवाडी गावामध्ये यत्लाप्पा माने  हा त्याच्या  राहात्या घरी असलेल्या शेळया बांधण्याच्या पत्र्याच्या सेडनेटमध्ये बेकायदा बिगर परवाना कोठूनतरी चोरुन चंदनाचे लाकडाचे तुकडे प्लॅस्टीकच्या पोत्यात भरुन त्याची चोरुन विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना  मिळाली.

Monday, May 18, 2020

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील.
● शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करा.
● ग्रामीण व शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा विचार करा. 
●जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा.-इति मुख्यमंत्री

मुंबई, (प्रतिनिधी)-
 कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिकस्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमीत शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशारितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिले.

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोणाबाधित

जिल्ह्यातील बाधितांची संख्या झाली 20: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

सांगली, दि. 18(जत न्यूज वृत्तसेवा)-
दिल्लीवरून दि.13 मे रोजी आलेल्या आटपाडी येथील 29 वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुंडलवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आता सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Sunday, May 17, 2020

चोरून जत, सांगोला तालुक्यात येणाऱ्या 106 जणांना पकडले

सांगोला पोलिसांची कारवाई; सर्व नागरिक मुंबईचे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या कोरोना संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही मुंबईहून तीन खासगी वाहनांतून 106 नागरिकांनी कुटुंबियांसह विनापरवाना व बेकायदेशीररित्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात प्रवेश केला असून या सर्वांना सांगोला पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे. या मध्ये जत तालुक्यातील राजोबाचीवाडी, निगडी येथे येणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे. अजूनही मुंबई,पुण्याचे लोक चोरून गावी परतत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. याचा लोकांनी धसका घेतला आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावतीने जत तालुक्यातील डॉक्टरांना 'पीपीई' कीट वाटप

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्हा पालकमंत्री नाम. जयंत पाटील यांच्याकडुन कोरोना विषाणूच्या लढ्यात लढा देणाऱ्या जत तालुक्यातील डाॅक्टरांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी पी. पी. ई कीटचे वाटप करणेत आले. जत येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, विशेष कार्य अधिकारी अमोल डफळे, राजारामबापू दुधसंघ संचालक शशिकांत पाटील यांच्या हस्ते कीटचे वाटप करणेत आले.

Wednesday, May 13, 2020

उमदीत वीज पडुन युवकाचा मृत्यू

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील उमदी गावाखालील तळ्ळीवस्ती येथे वीज पडुन बाबुलाल शेख (वय २५) हा जागीच मयत झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
 उमदीत बुधवारी सायंकाळी पाच वाजता वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी शेख हा गावातच होता. शेताकडे जायचे आहे म्हणून तो गावातून पावसातच आपल्या मळ्याकडे गेला. मात्र शेतात पोहोचताच त्याच्या अंगावर वीज कोसळली. पोटावर वीज पडल्याने तो भाग जळून तो जागीच मयत झाला. याबाबत महसूल विभागाला कळवण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे आईची भेट न झाल्याने मुलाने केली आत्महत्या


मुलगा बाज येथील; आत्महत्या केली रत्नागिरीमध्ये!
जत ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
लॉकडाऊनमुळे आईची भेट न झाल्याने १५ वर्षाच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी रत्नागिरी येथे घडली. आत्महत्या केलेला अल्पवयीन मुलगा मूळचा जत तालुक्यातील बाज  येथील आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव प्रशांत भाऊसो थोरात (वय.15) असे आहे.

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झाली 13
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्तींची कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सांगली येथील रेवेन्यू कॉलनीतील कोरोणाबाधित ठरलेल्या रुग्ण ज्या घरी राहिला होता, त्या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर महिला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये होती.
साळशिंगे येथे अहमदाबाद येथून आलेली जी व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह ठरली होती  त्या व्यक्तीचा गव्हात (ता. तासगाव) येथील सहप्रवाशीही कोरोणा पॉझिटिव्ह ठरला आहे . यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्याविषयी जयंत पाटील यांचा निर्णय स्वागतार्ह

प्रकाश जमदाडे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा) -
पुराचे पाणी दुष्काळी भागात देण्यविषयी जो निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी घेतला आहे, तो निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी सभापती व रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली आहे.
 महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत. सन २००५ सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत कारण, जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही पावसाचे प्रमाण आतिश्य कमी आहे.

शिक्षक कोरे यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्याची मागणी

जत शिक्षक भारतीने घेतली तहसिलदार सचिन पाटील यांची भेट
 जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  डफळापूरजवळ चेक पोस्टवर ड्युटी करणारे शिक्षक  नानासो कोरे यांचा काल झालेल्या अपघाती  मृत्यू दुर्दैवी असून या अनुषंगाने त्यांच्या वारसांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी व  वारसांना विनाअट शासकीय सेवेत घेण्यात यावे याबाबत  जत तालुका शिक्षक भारतीच्यावतीने जतचे तहसीलदार सचिन पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

कोरोना काळात मराठी चित्रपटसृष्टीला सकारात्मक दिलासा

प्लॅनेट मराठीची  सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा 
प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल. पण, त्यामुळे डगमगून न जाता निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ‘अॅमेझाॅन प्राइम’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा सिनेमा उचलून धरला.

Tuesday, May 12, 2020

सांगलीत आणखी तीन जण कोरोणा बाधित

जत तालुक्यातील आणखी एकाला कोरोना
जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा)-
 सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोणाबाधित झाले असून यामध्ये मिरज येथील आशा टॉकीज जवळील होळीकट्टा येथील 68 वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.जिल्ह्यातला एकूण कोरोना बाधितचा आकडा 11 वर गेला आहे.

Monday, May 11, 2020

ट्रकने चिरडल्याने शिक्षक ठार

डफळापूरजवळील घटना;शिक्षक चेकपोस्टवर ड्युटी बजावत होता
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील डफळापूरजवळ असलेल्या आंतरराज्य मार्गावरील चेकपोस्ट नाक्यावर कर्तव्य बाजावत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाला एका मालमोटारीने चिरडले. यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. नानासाहेब सदाशिव कोरे ऊर्फ पिंटू  (वय 36 , रा. डफळापूर) असे या शिक्षकाचे नाव आहे.ही घटना पहाटे सव्वा दोनच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्यासोबत कर्तव्य बजावत असलेले संजय बसगौडा चौगुले (वय 30) हे थोडक्यात बचावले.

लकडेवाडीत वादळी वाऱ्याचा दणका; पन्नास घरांची पडझड

झाडे उन्मळली, विजचे खांब मोडले; नुकसान भरपाईची मागणी
(वादळी वाऱ्यानेघराचे छप्पर उडून गेले आहे.)
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील लकडेवाडी येथे वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या  पावसाने मोठा दणका दिला असून काही घरांचे छत कोसळले तर अनेकांचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे असंख्य झाडे उन्मळून लांबवर उडून पडले आहे. विजेच्या खांबा मोडून पडल्याने तारा तुटल्या आहेत.त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Saturday, May 9, 2020

आशा स्वयंसेविका 11 ते 13 मे रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणार

कॉ. हणमंत कोळी, कॉ. मीना कोळी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
महाराष्ट्रातील सुमारे 72 हजार आशा कर्मचारी व 3 हजार 500 गटप्रवर्तक  आपल्या तातडीच्या  आरोग्य सुरक्षा विषयक प्रश्नांबाबत ,प्रलंबित शासकीय आदेशाच्या अंमल बजावणी बाबत , वाढीव करोना मोबादला व ठराविक वेतन मिळण्याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 11 ते 13 मे पर्यंत काळ्या फिती लावून दैनंदिन काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कॉ. हणमंत कोळी आणि कॉ. मीना कोळी  यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

Friday, May 8, 2020

मुंबईतून घुसखोरी केलेले दोघे 'कोरोना'बाधित

एक जत तालुक्यातील अंकलेचा;दुसरा सांगली शहरातील!
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात मुंबईतून घुसखोरी केलेल्या दोघांना 'कोरोनाची' लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक सांगली शहरातील शिवाजीनगर येथील रेव्हेन्यू कॉलनीतील आहे.तर दुसरा जत तालुक्यातील अंकले येथील आहे. जत पश्चिम भागात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अंकले गाव 'कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

Thursday, May 7, 2020

सांगली जिल्ह्यात वाहन अपघातात घट

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
गेल्या चाळीस दिवसांपासून लॉक डाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहने जाग्यावर थांबून आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात या चाळीस दिवसांत वाहन अपघातांमध्ये घट आली आहे.  एप्रिल महिन्यात फक्त 19 अपघातांची नोंद झाली आहे. 2019 हीच संख्या 62 इतकी होती.

दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद होणार?

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या शाळांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी ऑनलाईन'वेबिनार' मध्ये दहा आणि त्यापेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या आसपासच्या शाळा आयडेंटिफाय करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे. सांगली जिल्ह्यात कमी पटाच्या 121 शाळा आहेत.

जतमधील पोलिस,स्वयंसेवक अशा 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सिंगणहळ्ळी (ता. जत) येथील चेकपोस्टवर कार्यरत असणाऱ्या चार पोलीस कर्मचारी आणि  सात स्वयंसेवकांना खबरदारीचा उपाय म्हणून संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते.  व त्यांचे स्वब घेण्यात आले होते. या अकरा जणांचे कोरोनो रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आले आहेत, यामुळे जत तालुक्यासह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

Wednesday, May 6, 2020

जत तालुक्यातील बेवनूर येथील सहाजण क्वारंटाईन मध्ये!

घोरपडी कनेक्शन
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
मुंबईहून कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथे मूळ गावी येणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या संपर्कात आलेला त्याचा मेहुणा आणि मेहुणाच्या घरातील अशा सहा जणांना  इन्स्टिट्यूशनल  क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सगळे जत तालुक्यातील बेवनूर येथील आहेत. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली.

पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग सुरु


एस.सी.ई.आर.टी.पुणेचा उपक्रम- प्राचार्य डॉ.होसकोटी
सोन्याळ,(लखन होनमोरे यांजकडून)-
सांगली जिल्ह्यामध्ये पालक व मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभाग एस.सी.ई.आर.टी.पुणे यांच्यामार्फत मोफत तज्ञांचे समुपदेशन , मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डाॅ. रमेश होसकोटी  यांनी केले आहे.