Thursday, May 7, 2020

जतमधील पोलिस,स्वयंसेवक अशा 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सिंगणहळ्ळी (ता. जत) येथील चेकपोस्टवर कार्यरत असणाऱ्या चार पोलीस कर्मचारी आणि  सात स्वयंसेवकांना खबरदारीचा उपाय म्हणून संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते.  व त्यांचे स्वब घेण्यात आले होते. या अकरा जणांचे कोरोनो रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आले आहेत, यामुळे जत तालुक्यासह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील सोलापूर हद्दीवर असणाऱ्या शिंगणहल्ली चेकपोस्ट वर कार्यरत असणाऱ्या चार पोलीस कर्मचारी व सात स्वयंसेवक यांना काही दिवसांपूर्वी संस्था कोरेनटाईन करून त्यांचे स्वाब घेण्यात आले होते, या चेकपोस्ट जवळ असणाऱ्या सोलापूर हद्दीतील चेकपोस्ट वर असणाऱ्या एक पोलीस कर्मचारी कोरोनो पॉझिटिव्ह होता, यामुळे दक्षता म्हणून येथे कार्यरत असणाऱ्या 11 लोकांना तातडीने कोरेनटाईन करून त्यांचे स्वाब घेण्यात आले होते, यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती, त्यांचे अहवाल काय येणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या.
अखेर गुरुवारी या 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य कार्यालयातून देण्यात आली, या बातमीमुळे जत तालुक्याला चांगला दिलासा मिळाला आहे.दरम्यान, घोरपडी संपर्कातील बेवणुरच्या सहा जणांना कालपासून संस्था कोरेनटाईन केले आहे, त्या सगळ्यांचे देखील स्वाब घेण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment