Saturday, May 2, 2020

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत 3 खून

जिल्ह्यात खळबळ
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तीन खून झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात क्राईम रेट जवळपास नव्हताच त्यामुळे पोलीस यंत्रणेला एका बाजूने दिलासा मिळाला होता. मात्र दोन दिवसांत तीन खूनाच्या घटना घडल्याने  जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे या घटना जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना घडल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्यातील निमज येथे विजेच्या तारेवर टाकलेले आकडे काढत असताना बापलेकांनी दगडाने जोरदार मारहाण केल्याने ढालगावच्या वीज उपकेंद्रातील कंत्राटी कर्मचारी रमेश आनंदा दगडे (वय 41,रा.कदमवाडी ढालगाव) यांचा मृत्यू झाला. नितीन गोपाळ आमुणे व गोपाळ आमुणे अशी मारहाण करणाऱ्याची नावे आहेत.
दुसरी घटना घडली आहे ती सांगली वाडीत. येथे राहणाऱ्या बांधकाम कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. शिवाप्पा बसवंत केळगडे (वय 42, रा.सांगलीवाडी ,मूळ गाव- विजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून करून मृतदेह पोत्यात घालून कृष्णा नदी पात्रात टाकण्यात आला होता. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शिवाजी नामदेव शिंगे (वय40, बाळूमामा मंदिराजवळ, सांगली वाडी, मूळ गाव- सातलगी, इंडी विजापूर), हणमंत सिद्धअप्पा पुजारी (वय 35, मूळ गाव-ककमरी, ता. अथणी- बेळगाव) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.
तिसरी घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे घडली आहे. तलवारीने वार करून नेताजी धोंडीराम गोरे (वय 45) यांचा खून करण्यात आला. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment