Monday, May 4, 2020

'युथ फॉर जत' च्यावतीने 50 गरजू लोकांना किराणा मालाच्या किटचे वाटप

पंतप्रधान-मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही मदत
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या 'युथ फॉर जत' या सामाजिक संस्थेने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर  टाळेबंदीमुळे ज्या कुटुंबांची परवड झाली आहे , अशा 50 कुटुंबाना प्रत्येकी एक हजार रुपयांचे किराणा मालाचे किट वाटप केले. संस्थेने  यासाठी "संवेदना'  नावाचा उपक्रम राबविला आहे.
पहिल्या टप्यामध्ये एप्रिल च्या सुरवातीला संस्थेने जत भागातील मोलमजुर व बाहेरील राज्यातून रोजगार गमावलेले कामगार अशा ३० कुटुंबांचा शोध घेऊन  सुमारे ३५ हजार रुपयांचे किराणा साहित्य किट वाटले. संस्थेचे सदस्य डॉ. सुनील जोशी यांच्या गुजरात मधील गोकुळ ग्लोबल विद्यापीठ येथील कर्मचाऱ्यांनी यासाठी आर्थिक मदत केली.
त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये संस्थेचे  इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले  संस्थापक सदस्य  अजय पवार यांच्या मदतीने परत २० कुटुंबांना मदत करण्यात आली.  सैपून शेख, डॉ. गजानन रेपाळ, डॉ.सुनील जोशी, वैभव पुरोहित यांनी मिळून एकंदरीत २८ हजार रुपयांची रक्कम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली आहे.
संस्थेचे जतमधील स्थानिक सदस्य दिनेश शिंदे, अमित बामणे, सचिन जाधव, प्रमोद साळुंखे यांनी स्थानिक पातळीवर गरजू कुटुंबाचा शोध घेणे, किराणा साहित्य गोळा करून त्या कुटुंबांना पोहचवण्याचे काम केले.  अजून १५ हजार रुपयांचीआर्थिक  मदत देणगीदारांनी जगभरातून पाठवली आहे. ही मदतही गरजूंना लवकरच  पोहचवली जाणार आहे.

No comments:

Post a Comment