Friday, May 1, 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉक्टरांना फेस शिल्डचे वाटप


(राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सदस्य ऍड चन्नप्पा होर्तीकर यांच्याहस्ते जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदार संघातील डॉक्टराना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले)
उमदी,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा
ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत
अशा सर्व डॉक्टरांना महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जतपुर्व भागातील जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदान संघातील माडग्याळ, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद आदी गावातील सर्व डॉक्टरांना फेस सिल्डचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूने जगातील अनेक देशात प्रवेश केला असून हजारो लोक त्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणू हवेवाटे पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे शिंकल्यावर, खोकल्यावर तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्याचा सल्ला दिला जातो. वारंवार चेहर्‍याला हात न लावण्याच्या सूचनाही तज्ज्ञांनी दिल्या आहेत. त्यातच मास्कने फक्त तोंडाला संरक्षण मिळते त्यामुळे बाकी चेहर्‍याच्या भागाला संरक्षण मिळावे म्हणून फेस शिल्ड प्रभावी ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण चेहर्‍याचे संरक्षण होणार असून या फेस शिल्ड पासून डॉक्टरांचे सुरक्षितता वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज
 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर, तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, युवा नेते रवी शिवपुरे, पत्रकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ यांच्याहस्ते फेस शिल्ड वाटप करण्यात आले. यावेळी डॉ चंद्रशेखर हिट्टी,डॉ चंद्रमणी उमराणी, डॉ.महादेव जाधव, डॉ शिवानंद बगली, डॉ. प्रदीप शिंदे,डॉ दिलीप हक्के, डॉ सौ शिवमाला हिट्टी,डॉ. सौ.अर्चना जाधव आदी  उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड. चन्नापाण्णा होर्तीकर म्हणाले की, जत पुर्व भागात मोठी जोखीम स्वीकारुन डॉक्टर काम करत आहेत. ग्रामीण भागात काम करत असताना डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा कठीण परिस्थितीत देखील ते काम करत असल्याने जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व डाँक्टर यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांच्या सर्व समस्या पालकमंत्री जंयत पाटील यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील.

No comments:

Post a Comment