Tuesday, May 12, 2020

सांगलीत आणखी तीन जण कोरोणा बाधित

जत तालुक्यातील आणखी एकाला कोरोना
जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी
सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा)-
 सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोणाबाधित झाले असून यामध्ये मिरज येथील आशा टॉकीज जवळील होळीकट्टा येथील 68 वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.जिल्ह्यातला एकूण कोरोना बाधितचा आकडा 11 वर गेला आहे.
 मुंबईतून  जत तालुक्यातील अंकले येथे अवैध रित्या आलेल्या चौघांपैकी एकाला या अगोदरच कोरोनाची लागण झाली होती.  आता त्याचा  एक सहकारीही कोरोना बाधित झाला आहे .  आज तिघांना कोरोना लागण झाली आहे. यातील दोन महिला आहेत तर एक पुरुष आहे. कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केले असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे . या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सतर्क राहा, घरी राहा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन केले जात आहे.

1 comment:

  1. Sangaliker take care don't take lightly be careful follow the instructions given by administration

    ReplyDelete