Monday, May 18, 2020

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोणाबाधित

जिल्ह्यातील बाधितांची संख्या झाली 20: जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

सांगली, दि. 18(जत न्यूज वृत्तसेवा)-
दिल्लीवरून दि.13 मे रोजी आलेल्या आटपाडी येथील 29 वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुंडलवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आता सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्लीवरून आल्याने एका इसमास आटपाडी येथे कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. काल मिरज सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. व स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर इसमाची पत्नी व मुलगीही आयसोलेशन कक्षात असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
त्याच बरोबर कुंडलवाडी येथील कोरोणाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईक इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता. सदर व्यक्तीचा इस्लामपूर येथे स्वाब  घेण्यात आला होता. सदरचा अहवाल प्राप्त झाला असून कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात उपचाराखालील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या जिल्हा व राज्याच्या बाहेरून लोक येत असून त्यामुळे  ग्रामीण भागात खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 

No comments:

Post a Comment