Tuesday, May 19, 2020

रावळगुंडवाडीत पावणे चार लाखाचे चंदन जप्त

उपविभागीय पोलीस कार्यालयाची कारवाई 
(फाईल फोटो)
जत, (जत न्यूज वृत्तसेवा) -
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे 106 किलोच्या चंदनाची झाडे तोडून व त्याचे लाकूड विक्रीसाठी विनापरवाना साठा करून ठेवल्याप्रकरणी  जत उपविभागीय पोलिस आधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून  पकडले आणि  3 लाख 71 हजार रुपयांचा चंदन लाकडाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत आज  मंगळवारी  रावळगुंडवाडी गावामध्ये यत्लाप्पा माने  हा त्याच्या  राहात्या घरी असलेल्या शेळया बांधण्याच्या पत्र्याच्या सेडनेटमध्ये बेकायदा बिगर परवाना कोठूनतरी चोरुन चंदनाचे लाकडाचे तुकडे प्लॅस्टीकच्या पोत्यात भरुन त्याची चोरुन विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना  मिळाली.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, पोलीस नाईक विजय कालीदास अकुल, पोलीस नाईक सुनिल अशोक व्हनखंडे, पोलीस नाईक वाहीदअली, जबरदस्त मुल्ला आदी कर्मचाऱयांसह बातमीची खात्री करुन आरोपी यल्लाप्पा लक्ष्मण माने (वय-43 वर्षे रा. रावळगुंडवाडी ता.जत जिल्हा सांगली)  यास ताब्यात घेतले व यातील एकुण मुददेमाल 3 लाख 71 हजार रुपये किंमतीची चंदनाच्या लाकडयांची तुकडे  जप्त केले. ही लाकडे पोत्यात भरुन ठेवलेले  होते ते एकुण 106 किलो  वजनाचे होते. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीिस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत दिलीप जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व उपनिरीक्षक सुभाष कांबळे,विजय कालीदास अकुल,सुनिल अशोक व्हनखंडे, वाहीदअली जबरदस्तअली मुल्ला यांनी खात्री केली.  मुददेमाल आणि आरोपीची माहिती दिली त्यानंतर उपविभागाकडील पोलीस कर्मचारी गजेंद्र नरसु भिसे, सागर नारायण पाटील, विठठल रामण्णा माळी, परमेश्वर नाना ऐवळे, सुरेश व्हन्नाप्पा माळी, अशोक सुर्यवंशी, कांतीलाल हिप्परकर, गोविंद चव्हाण अनिल तुकाराम चव्हाण आदींनी ही  कारवाई केली आहे.  आरोपीस अटक करणेत आलेली आहे. पुढील तपास जत पोलीस ठाणे कडील पोलीस नाईक विनायक शिंदे करीत आहेत.

No comments:

Post a Comment