Sunday, May 3, 2020

अंत्यसंस्कारला गेला नि कोरोना घेऊन आला

कर्नाळ येथील एक जण करूना बाधित
 सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील एक जण सातारा येथे आजोळी आजी वारल्याने गेला होता. तिथे कोरोनाचा संसर्ग झाल्याने 'अंत्यसंस्कारला गेला आणि कोरोना घेऊन आला म्हणण्याची वेळ आली आहे.दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱयांची संख्या सात झाली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेली माहिती अशी की, कर्नाळ येथील एकजण आजोळी आजीच्या अंत्यसंस्कारला गेला होता.  त्याच ठिकाणी त्यांचे मावसभाऊ मुंबईहून आले होते. त्या घरात सातारा येथील एक व्यक्ती कोरोणा बाधित झाल्याचे सातारा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना कळविले. त्यानुसार कर्नाळ येथील सदर व्यक्तीला  २ मे रोजी मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात खबरदारी म्हणून ऍडमिट करण्यात आले. सदर व्यक्तीला कोणतीही लक्षणे नव्हती. तरी या व्यक्तीची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू झाले असून त्या ठीकाणी आणि वैद्यकीय पथक पोहोचले आहे‌.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या उपचाराखालील रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

No comments:

Post a Comment