Thursday, May 28, 2020

मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज माफ करा - विजय ताड

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश २३ मार्च पासून लॉकडाउन मध्ये आहे.महाराष्ट्रातदेखील लॉकडाउन चालू आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत.त्यामुळे गोरगरीब व गरजू महिलांनी आपला उद्योग व्यवसाय आणि घर प्रपंच चालवण्यासाठी जत शहरात असणाऱ्या भारत फायनान्स , स्पंदना फायनान्स ,आर बी एल आणि ग्रामीण कोटा व अन्य फायनान्स कंपन्याकाडून छोट्या मोठ्या स्वरूपात कर्जे घेतले आहेत.त्यांचे हप्ते साप्ताहिक,पाक्षिक व मासिक स्वरूपाचे आहेत.ते सर्व कर्जे शासन स्तरावरून माफ करावे, अशी मागणी जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे .

श्री.ताड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २३ मार्च २०२० पासून सारा देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे लॉकडाउन आहे. अशा लॉक डाउनच्या काळात सर्व व्यवसाय व व्यवहार बंद आहेत. अशात गरीब व हातावरच्या पोटे असलेल्या महिलांना आपले घर कसे चालवायचे याचा प्रश्न पडलेला आहे. रोजंदारीची कामे, छोटे मोठे उद्योग बंद पडले आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मूळ व्यवहार व व्यवसाय पूर्व पदावर येण्यासाठी किती काळ लागेल सांगता येत नाही .
अशात गोरगरीब महिलांनी कर्जाचे हफ्ते भरणे अशक्य आहे.गोरगरीब महिलांवर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी या महिलांनी घेतलेले मायक्रो फायनान्स कंपनीची कर्जे शासन स्तरावरून माफ करण्यात यावेत, अशी मागणी जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment