Saturday, May 30, 2020

आधी मोबाईल, मग शाळा

मुलांचा हट्ट; ऑनलाइन शिक्षणाचा प्रभाव
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
दोन  महिन्यांपासून देशात टाळेबंदी आहे.  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  मार्च महिन्यातच शाळा बंद केल्या.  द्वितीय सत्राच्या परिक्षा रद झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू  नये, यासाठी राज्यात ऑनलाईन  शिक्षण देण्याचा उपक्रम शासनाने  सुरू केला आहे. याचा परिणाम आता गावखेड्यात बघायला मिळत आहे.  पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी पालकांची मोबाईल दुकानात गर्दी बघायला मिळत आहे. पहिले मोबाईल  नंतर शाळा अशी अवस्था सर्वत्र आहे. शिक्षणापासून  टाळेबंदीतही शैक्षणिक कार्य  सुरू रहावे, यासाठी शिक्षण विभागाने  उपाययोजना केली आहे.

दरम्यान, गरीब विद्यार्थ्याचे पालक खायला अन्न नाही तिथे मोबाईलसाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. ऑनलाईन  शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळातील  विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्सअप  ग्रुप बनविण्यात आले. या अनुषंगाने  शाळांतील शिक्षकांनी पालकांचे  व्हाट्सअप नंबर शोधण्याची मात्र  शोधमोहीम सुरू केली. पालकांचे  व्हाट्सअप ग्रुप बनवून पालकांना पालक  आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक  उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. शिवाय आता प्राथमिक शाळांनाही आता पालकांचे मोबाईल नंबर शोधून रोजचे एपिसोड त्यांच्या व्हॉटस अप ग्रुपवर टाकण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या महिना दीड महिन्यापासून शिक्षण विभागाने  सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण  सुरू केलेले आहे. इयत्ता पहिली ते  दहावीपर्यंतच्या विद्याथ्यांना 'शाळा  बंद · पण शिक्षण सुरू आहे' या  सदराखाली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडून प्रत्येक विषयावर ऑनलाईन माहिती देण्यात येत आहे. वर्गनिहाय व विषय निहाय शैक्षणिक लिंक व्हाट्सअप ग्रुपवर प्रसारित करण्यात येत आहे. हा उपक्रम टाळवेंदीत सुरू
झाल्यामुळे 'स्मार्टफोन'नसणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागले.
आता विद्यार्थ्याचा मोबाईलसाठी हट्ट सुरु झाला. पालकांनाही याबाबतची पूर्वकल्पना असल्यामुळे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी साठी जुळवाजुळव सुरू केली. बाजारपेठ सुरू होताच पालकांनी मोबाईल शॉपिंग मध्ये गर्दी केली.
मात्र संपूर्ण उद्योगधंदे बंद असल्यामुळे मागणीनुसार पुरवठा कमी आहे. पालक आठवडाभरापासून मोबाईल खरेदीसाठी 'वेटिंग'वर आहेत. काही वर्षांपूर्वी शालेय वेळात शाळातून मोबाईल वापरावर प्रतिबंध घालण्यात आले होते. मात्र काळानुरुप त्याच मोबाईल ने ऑनलाईन शिक्षणात आपले महत्त सिद्ध केले आहे. टाळेबंदीच्या चवथ्या टप्प्यात मोबाईल खरेदीसाठी दुकानात पालकांची गर्दी वाढली आहे.
दरम्यान,मागणी जास्त, पुरवठा कमी अशी मोबाईलची अवस्था झाली आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइल खरेदी अचानक वाढली आहे. मात्र टाळेबंदी असल्यामुळे मोबाईलचा पुरवठा बंद आहे.
मागणीनुसार मोबाईल पुरवठा होत नसल्यामुळे ग्राहकांना अपेक्षेप्रमाणे मोबाईल मिळत नाही. जिल्ह्याच्या होलसेलकडेही मोवाईलचा तुटवडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किरकोळ दुकानदारांच्या मोबाईल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

No comments:

Post a Comment