Sunday, May 31, 2020

शाहू आश्रमाशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे सेवानिवृत्त


( सिद्धार्थ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार  उमाजीराव सनमडीकर व सचिव डॉ.  कैलास सनमडीकर व संचालिका डॉ.  सौ. वैशाली सनमडीकर यांच्या हस्ते  श्री. कारंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.)
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ ,सनमडी (ता.जत) संचलित  जत येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक  आश्रमशाळा जत या शाळेतील  मुख्याध्यापक  राजेंद्र मारुती कारंडे यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार  31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल त्यांना संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी व संचालक मंडळ व सर्व शाखेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून त्यांना त्यांच्या भावी आयुष्य निरोगी, आरोग्य संपन्न व आनंदी, सुखी जावो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
कायमस्वरूपी हसतमुख असणारे व्यक्तिमत्व व लहान मोठ्यांचा आदर करणारे व उत्तम मार्गदर्शक, उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे.  भावी काळातसुध्दा आपले मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभो ही अपेक्षा  व्यक्त करण्यात आली. तसेच  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन असल्याने सिद्धार्थ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार  उमाजीराव सनमडीकर व सचिव डॉ.  कैलास सनमडीकर व संचालिका डॉ.  सौ. वैशाली सनमडीकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment