Monday, May 11, 2020

ट्रकने चिरडल्याने शिक्षक ठार

डफळापूरजवळील घटना;शिक्षक चेकपोस्टवर ड्युटी बजावत होता
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील डफळापूरजवळ असलेल्या आंतरराज्य मार्गावरील चेकपोस्ट नाक्यावर कर्तव्य बाजावत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाला एका मालमोटारीने चिरडले. यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. नानासाहेब सदाशिव कोरे ऊर्फ पिंटू  (वय 36 , रा. डफळापूर) असे या शिक्षकाचे नाव आहे.ही घटना पहाटे सव्वा दोनच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्यासोबत कर्तव्य बजावत असलेले संजय बसगौडा चौगुले (वय 30) हे थोडक्यात बचावले.

डफळापूर येथील शिंगणापूर- अनंतपूर या  आंतरराज्य मार्गावरील चेक नाक्यावर वर हे शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होते.
सिमेंटने भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे निघाला होता. घटनेनंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल आहेत.अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment