Monday, May 4, 2020

ऍमेझॉन-फ्लिपकार्टवर उत्पादन विक्री करण्यास परवानगी

रेड झोनमध्ये विक्रीला बंदी; ग्रीन,ऑरेंजमध्ये विक्री होणार
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक उत्पादनाची डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. देशातील काही शहरात आजपासून ही सेवा सुरू केली आहे. यात एक अट घातली आहे. ती म्हणजे देशातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये या कंपन्यांना आपली सुविधा देता येणार आहे. रेड झोनमध्ये ही सुविधा अद्याप देण्यात येणार नाही.

भारत सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, ई-कॉमर्स साइटवर आजपासून डिलिव्हरी सुरू केली. ग्रीन आणि ऑरेंज झोन क्षेत्रात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत विक्री संबंधित काम केले जाणार आहेत.
रेड झोनला परवानगी नाही
नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ही परवानगी रेड झोनमधील क्षेत्रात नाही. या क्षेत्रातील लोकांना केवळ आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.
रेड झोनमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
ऑफलाइन स्टोर उघडणार
ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही रिटेल स्टोर उघडण्यात येणार आहेत. यात स्मार्टफोनच्या स्टोरचा समावेश आहे. ग्राहक स्मार्टफोन-लॅपटॉप खरेदी करू शकणार आहेत.
आता ४ मे पासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील व्यक्तींना लॅपटॉप, स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची ऑर्डर करता येणार आहे. पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे यांनी सांगितले की, ग्राहकांना एसी, फ्रीज आणि उन्हाळ्यामधील दिलासा देणारे कपडे खरेदी करता येतील. लोक सध्या वर्क फ्रॉम होम करीत असल्याने लॅपटॉप, मोबाइल फोन, कम्प्यूटर हार्डवेअर आणि लेखन सामुग्री खरेदी करता येणार आहे.
महाराष्ट्रातील ग्रीन, ऑरेंज झोनमधील जिल्हे
वर्धा – ग्रीन झोन
गडचिरोली – ग्रीन झोन
गोंदिया – ग्रीन झोन
सिंधुदुर्ग – ग्रीन झोन
वाशिम – ग्रीन झोन
उस्मानाबाद – ग्रीन झोन
बीड – ऑरेंज झोन
भंडारा – ऑरेंज झोन
लातूर – ऑरेंज झोन
सांगली – ऑरेंज झोन
परभणी – ऑरेंज झोन
चंदपूर – ऑरेंज झोन
नांदेड – ऑरेंज झोन
जालना – ऑरेंज झोन
रत्नागिरी – ऑरेंज झोन
हिंगोली – ऑरेंज झोन
कोल्हापूर – ऑरेंज झोन
नंदूरबार – ऑरेंज झोन
अमरावती – ऑरेंज झोन
बुलडाना – ऑरेंज झोन
अहमदनगर – ऑरेंज झोन
रायगड – ऑरेंज झोन

No comments:

Post a Comment