Monday, May 25, 2020

शेतकऱ्यांचे सहा महिन्याचे विज बिल माफ करावे

विकास साबळे
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जगभर कोरोना महामारीचे संकट ओडविले आहे. त्यामुळे मार्चपासून देशभर लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहेत. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या आशेवर भाजीपाला, फळबागा व इतर पिकांची लागवड केली होती.उत्पन्नही बऱ्यापैकी आले होते.मात्र लॉकडाऊनमुळे बाजार समित्या, आठवडे बाजार बंद असल्यामुळे माल पडून राहिला, त्यांची विक्री झाली नाही.
त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे शासनाने सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे. भाजीपाला,फळ-फळावळ यांची विक्री न झाल्याने ते शेतकऱयांनी  जनावरांना घातला, काही जणांनी थेट शेतात नांगर फिरवला. तसेच लागवडीच्या पट्टीत उत्पन्न आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा  आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातच जनावरांच्या वैरण, पेंडीचे दर भकडले असताना, दुधाचे भाव पडले आहेत.अशा परिस्थितीत जगाचा पोशिंदा बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या किमान विहिरीवरील मोटारीची सहा महिन्याचे वीज बील माफ
करून दिलासा द्यावा,  अशी मागणी रिपाइचे जिल्हाध्यक्ष विकास साबळे यांनी  एका निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment