Tuesday, May 5, 2020

अभ्यास कर म्हटल्याने विद्यार्थ्याची सिंगनहळ्ळी येथे आत्महत्या

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सिंगनहळ्ळी (ता. जत) येथे टीव्ही जास्त बघू नकोस, बाहेर फिरू नकोस व अभ्यास कर, असे सांगितल्याच्या कारणावरून एका शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विराज आप्पासाहेब हिप्परकर (वय
हिप्परकर १५) असे त्याचे नाव असून दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विराजचे वडील -आप्पासाहेब हिप्परकर हे जत एसटी आगारात चालक म्हणून नोकरी करतात. 'तू आता इयत्ता ९ वी मध्ये जाणार आहेस. त्यामुळे आतापासूनच १० वी परीक्षेचा अभ्यास करायला लाग, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने घराबाहेर पडू नकोस', असे म्हणून वडील त्याला रागावले. विराजने याचा राग मनात धरून जुन्या घरातून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या नवीन बांधलेल्या घरात जाऊन आत्महत्या केली आहे. या घराजवळ खेळणाऱ्या लहान मुलांनी हा प्रकार पाहून विराजच्या घरी सांगितले. घरच्यांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार विजय वीर व आप्पासाहेब हाक्के करत आहेत.

No comments:

Post a Comment