Friday, May 29, 2020

सांगलीत दक्षिण शिवाजी नगरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली शहरातील  दक्षिण शिवाजीनगर (प्रभाग क्रमांक 17) मध्ये नुकतेच शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या घोष्यवाक्या प्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या प्रमाणे जनतेच्या सेवा केली जाणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर .शिवसेना शहर प्रमुख महेंद्र चंडाळे . मयूर घोडके. हरिदास लेंगरे  तसेच अखिल भारतीय होलार समाज संघटना (ए गट) राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब ऐवळे. युवक जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कराडे. शिवसेनेचे कुपवाड शहर माजी शहरप्रमुख सुरेश साखळकर. महाराष्ट्र कामगार सेनेचे  शहराध्यक्ष शितल थोरवे. महाराष्ट्र कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील. उपशहर अध्यक्ष मुकुंद आवळे. शिवसेनेचे विभागप्रमुख धनाजी कोळपे.जिवन केंगार.विजय बल्लारी.शिवसेनेचे शिवसैनिक सुरेश केंगार, संदिप दिंडे.हातेकर.मंदार काटकर .बाळभाई रंगारी.शिवसेना शाखा प्रमुख सुरज जाधव यांच्या सह  शिवसैनिक, पदाधिकारी व प्रभागातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment