Friday, May 22, 2020

वाळेखिंडीतील नऊ जण इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन

गाव 14 दिवस बफर झोनमध्ये
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे  एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने  त्या रुग्णाच्या घरातील 9 व्यक्तींना जत येथे 'इन्स्टिट्यूटशनल क्वारंनटाईन' ठेवण्यात आले आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे मुंबईहुन आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेनंतर गुरुवारी रात्री आरोग्यअधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, यांनी गावाला तातडीने भेट दिली. शुक्रवारी गावातील सरपंच,पोलिस पाटील व इतर पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.
घटनास्थळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी आशिष येरेकर, तहसीलदार सचिन पाटील, ,तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, पोलिस निरीक्षक रामदास शेळके, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तिकर ,सरपंच माधवी पाटील, पोलीस पाटील अजित पाटील,विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार सचिन पाटील म्हणाले की, वाळेखिंडी येथील व्यक्ती हा पती पत्नीसह गावी दि.17 मे रोजी दुपारी आला होता. त्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने मिरजेला पती-पत्नीसह कोविड रुग्णालयात
बुधवारी दाखल केले. गुरुवारी स्वबचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर पत्नीचा निगेटिव्ह आला आहे. दरम्यान घरातील 9 व्यक्तींना जत येथे इन्स्टिट्यूटशनल क्वारंनटाईन केले आहे. सदर व्यक्ती हा वाळेखिंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर राहत असल्याने त्या भागातील 500 मीटर अंतरावरचा परिसर हा कँटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. तर पूर्ण गाव चौदा दिवस बफरझोन म्हणून घोषित केले आहे.या कालावधीत गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच गावाला जोडणारे प्रमुख रस्ते सीलबंद करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment