Tuesday, May 19, 2020

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधित

जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी 
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा) -
रेड ता.शिराळा येथे मुंबईहून दिनांक 17 मे रोजी  42 वर्षीय महिला आली होती . सदर महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आले होते . लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल मिरज आयसोलेशन कक्षाकडे संदर्भित केले होते. या महिलेचा आज कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तसेच बलवडी ता. खानापूर येथे दिनांक 15 मे रोजी दिल्लीहून 55 वर्षीय पुरुष आला होता. या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. लक्षणे उद्भवल्याने त्यांना काल   मिरज आयसोलेशन कक्षात संदर्भित करण्यात आले होते. सदर व्यक्तीचा कोरोणा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे . या
दोन्ही कोरोना बाधितांच्या निकटवर्तीयांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून अनुषांगिक उपाय योजना करण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment