Friday, May 8, 2020

मुंबईतून घुसखोरी केलेले दोघे 'कोरोना'बाधित

एक जत तालुक्यातील अंकलेचा;दुसरा सांगली शहरातील!
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात मुंबईतून घुसखोरी केलेल्या दोघांना 'कोरोनाची' लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक सांगली शहरातील शिवाजीनगर येथील रेव्हेन्यू कॉलनीतील आहे.तर दुसरा जत तालुक्यातील अंकले येथील आहे. जत पश्चिम भागात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अंकले गाव 'कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

मुंबईहून ते अंकले कोरोना रुग्णाचा  प्रवास असा आहे- जत तालुक्यातील अंकले (ता.  जत) येथे मुंबईहून आलेल्या एकाचा  'कोरोना' अहवाल 'पॉझिटिव्ह'  असल्याचे आज पहाटे समजले.  त्याच्यासह चौघेजण मुंबईत नोकरीस  होते. सर्वजण बुधवारी चेंबूर (मुंबई)  हून वाशी येथे टॅक्सीने, वाशी ते फलटण आणि तेथून नागजपर्यंत  मालट्रकमधून आले होते. नागजहून
चौघेजण चालत अंकले येथे आले  होते.
अंकलेत आलेल्या रुग्णास जिल्हा  परिषद शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन  केले होते. त्याला बुधवारी रात्री ताप,  मळमळणे, खोकला, आदीसह त्रास  होऊ लागला. त्याला कोरोना संशयित  म्हणून आरोग्य विभागाने तत्काळ  मिरज येथे हलविले होते. आज त्यांचा  अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे.
त्यानंतर आज शुक्रवारी त्याच्या  संपर्कातील सहा जणांचे 'स्वब' घेण्यात  आले आहेत. त्यांनाही जतमध्ये
संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले  आहे. या अहवालानंतर अंकले गाव  'सील' करण्यात आले आहे. तसेच  सावधगिरी म्हणून तालुक्यातील प्रमुख सीमा पूर्णपणे सील' करण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासनाने पवित्रा घेतला आहे.
अंकलेतील कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत कत्तलखान्यात कामाला होता. 'लॉकडाऊन'नंतर जेवणाची अडचण
निर्माण आल्याने तो मालकाच्या घरी जेवायला होता. त्यानंतर ४ मे रोजी तो आणि गावातील तिघेजण
चेंबूरहून टॅक्सीने वाशी, तेथून ट्रकने फलटण व फलटणहून पुन्हा ट्रकमधून  नागजपर्यंत आले. तेथून पायी चालत बुधवारी मध्यरात्रीनंतर अंकले येथे
आले. तो घरी न जाता सरळ जिल्हा  परिषद शाळेत राहायला गेला.  आरोग्य विभागाने त्याला संस्थात्मक
'क्वारंटाईन' केले. बुधवारी त्रास  झाल्यानंतर त्यानेच स्वतः फोनवरून  डफळापूर आरोग्य केंद्रात डॉक्टरांना
सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा नऊ  वाजता सांगलीच्या टीमने कोरोना  संशयित रूग्ण म्हणून मिरजेत हलविले.  त्यानंतर आज त्याचा अहवाल
'पॉझिटिव्ह' आला. त्याच्यासह  आलेले तिघे अन्य संपर्कातील तिघे  अशा सहाजणांचे स्वब तपासणीसाठी
पाठवले आहेत. त्यांना जत शहरात  संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले  आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्याला घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मुंबईहून जिल्ह्यात घुसखोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबईहून रुग्ण येत असल्याने इथला आकडा वाढत असून धास्ती निर्माण झाली आहे. मालट्रकमधून तसेच अन्य मार्गाने मुंबईतील नागरिक थेट येथे दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा आणखी काटेकोरपणे'सील' करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment