Friday, May 29, 2020

सांगली जिल्ह्यात आज नव्याने कोरोणा बाधित रुग्ण नाही

तर एक जण कोरोणामुक्त
सांगली दि. 29 (जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण एकही नाही . तर एक जण कोरोणा मुक्त झाला आहे . उपचारा खालील रुग्णांची संख्या तीन आहे .तर आज अखेर कोरोणा मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 55 झाली आहे. आज आखेर  तीन कोरोणा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 101 एकूण कोरोणाबाधित ठरले आहेत . यापैकी तीन रुग्णांची संख्या चिंताजनक आहे . सध्य स्थितीत प्राप्त रिपोर्टनुसार आज एकही नवीन बाधित रुग्ण नाही. सोहली तालुका कडेगाव येथील 54 वर्षे पुरुष कोरोना मुक्त झाला आहे.

     ज्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे यामध्ये नेरली तालुका कडेगाव येथील 57 वर्षीय पुरुष असून सदर व्यक्ती मुंबईवरून आलेला प्रवासी आहे. सदरचा रुग्ण नाॅन इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेला आहे . कडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षीय पुरुष ऑक्सीजनवर उपचार सुरू आहेत. खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षीय पुरुषावर ही नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर उपचार सुरू आहेत. तर सुलतानगादे तालुका खानापूर येथील 57 वर्षीय महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.
अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment