Monday, May 4, 2020

स्वच्छता व सोशल डिस्टन्समुळे आजाराच्या प्रमाणात घट

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या 'कोरोना' मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल काही ठराविक वेळेसाठी सुरू राहतात. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणाच्या रुग्णाच्या झुंडी, औसंडून वाहणारे वॉरई, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकनांमधील गर्दी... सारे बही थांबले आहे.

दवाखाने किंवा रुग्ण कुठे गायब झाले? गायब वगैरे काही झालेले नाहीत. कुणी रुग्णच नाही सध्या ! त्याचे कारण आपण सध्या स्थयितीत कोरोनाच्या भितीपौटी स्वच्छता विश्रांती, तणाव,आहार, प्रदूषण झालेल्या गोष्टीचे कटाक्षाने पालन करतो, त्यामुळे ईतर आजाराचे रूण गायब झालेले दिसत आहे. भविष्यात हयाच गोष्टी आपण आचरणात ठेवल्यात तर दवाखान्यात जाण्याची वेळ आपल्यावर नककीच येणार नाही.आपण हात बारबार घुऊ लागलो. सनिटायझर वापरायला सुरवात कैली.
मास्क वापरत आहोत. आणि सोशल डिस्टन्सिंग (दोन व्यक्तीमधील अंतर) पाळत आहोत. आपण पुरेशी विंश्राती घेत आहोत. पुरेशी झौप घेत आहोत. प्रत्येकाने किमान ७ तास झोप घेणे आवश्यक असते. लॉकडाऊनमुळे ही विश्रांतीची, झोपेची गरज पूर्ण होत आहे. कमी झालेली स्ट्रेस लेव्हल, बहुतेक आजार
हे मानसिक ताणाशी संबंधित असतात. लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुंटुबाला वेळ देता येत आहे. मित्र, नातेवाइकांशी आपण फोनवर संवाद साधत आहोत. या संवादामुळे तणावाची पातळी आपोआप कमी झाली आहे. यामुळे आरोग्याचा दर्जा सुधारत आहे.
लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने आपोआप हॉटेलींग पूर्णतः बंद झ्ाले आहे. त्यामुळे 'फास्ट फूड', चमचमीत मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ, रस्त्यावरील खाणे यापासून सुटका झाली.घरचे आरोग्यदायी खाणे आजारापासून दूर ठेवीत आहे.
लॉकडाऊनमुळे कार्यालये, बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने नाहीत. कारखाने बंद आहेत त्यामुळे हवेचे, पाण्याचे आणि आवाजाचे प्रदूषण नाही, त्यामुळे प्रदूषणापासून होणारे आजार थांबले आहेत. आपल्याला कोरोनामुळे सर्व प्रकारच्या व्यसनांवर मर्यादा आली आहे. त्यातून उद्धवणारे आजार कमी झाले आहेत. कोरोनाचा धोका कमी झाल्यावरही आपण या ५ गोष्टीमध्ये सातत्य पाळले तर आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो.

No comments:

Post a Comment