Thursday, May 21, 2020

सांगली जिल्ह्यात दिवसभरात ८ जण कोरोणा बाधित

वाळेखिंडीत एक रुग्ण आढळला; भिकवडीतील वृद्धाचा मृत्यू 
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात ८ जण कोरोना बाधित झाले असून यापैकी कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील 65 वर्षीय कोरोणाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती मुंबईवरून दिनांक 17 मे रोजी जिल्ह्यात आली होती. त्यांना मधुमेह , रक्तदाबाचा विकार होता‌. दरम्यान, जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे एक 32 वर्ष वयाचा रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे जत तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 3 झाली आहे.
शिराळा तालुक्यातील मोहरेयेथील एक व्यक्ती (५०वर्षे पुरुष) कोरोणा बाधित ठरला आहे .तसेच रेड येथील कोरोणा बाधित महिलेचा निकटवर्तीय नातेवाईक (२० वर्षीय पुरुष)कोरोनाबाधित ठरला आहे. आटपाडी तालुक्यातील चार व्यक्ती कोरोना बाधित झाल्या असून यापैकी सोनारसिद्ध नगर येथील दोन बहिणीं कोरोना बाधित ठरल्या आहेत. यापैकी एकीचे वय २२ वर्ष व एकीचे वय 26 वर्षे आहे . तर पिंपरी खुर्द येथील एक रुग्ण (26 वर्षीय पुरुष) कोरोनाबाधित असून दुसरा आटपाडी येथील (27 वर्षीय पुरुष) कोरोना बाधीत ठरला आहे आहे.
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील एक व्यक्ती (32 वर्षे पुरुष) ही कोरोना बाधित ठरला आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी  येथे तिसरा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती 17 मे रोजी कळंबोली -मुंबई येथून  पत्नीसह आला आहे. दोघांनाही होम कोरटाईन करण्यात आले होते. 35 वर्षाच्या या व्यक्तीस बुधवारी  त्रास होऊ लागल्याने मिरज येथील रुग्णालयात त्याची तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आली तर त्याच्या निगेटिव्ह आली आहे.  हे दोघेही खासगी वाहनाने 17 मे रोजी वाळेखिंडीला आले होते. गाडीचा चालक कळंबोली येथील होता. यापूर्वी जत तालुक्यातील अंकले येथील दोघांना कोरोना झाला आहे. हे दोघेही मुंबईतून आले होते. सांगली जिल्ह्यात आता रुग्णांची संख्या 24 झाली आहे.
या सर्व ठिकाणी कंटेनमेंट झोन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करण्यात येत आहेत . तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही करण्यात येत आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ .अभिजित चौधरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment