Wednesday, May 13, 2020

सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झाली 13
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यातील दोन व्यक्तींची कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सांगली येथील रेवेन्यू कॉलनीतील कोरोणाबाधित ठरलेल्या रुग्ण ज्या घरी राहिला होता, त्या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . सदर महिला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये होती.
साळशिंगे येथे अहमदाबाद येथून आलेली जी व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह ठरली होती  त्या व्यक्तीचा गव्हात (ता. तासगाव) येथील सहप्रवाशीही कोरोणा पॉझिटिव्ह ठरला आहे . यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
आता सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. इस्लामपूर शहरात पहिल्यांदा कोरोना रुग्ण आढळून आले होते. ते मक्केहून आल्याने त्यांना कोरोना बाधा झाली होती. नंतर सांगली शहरातील विजयनगर येथे एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेले कवठेमहांकाळ येथे आलेल्या दोघांना कोरोना झाला होता. आता काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातील अंकले येथे दोन कोरोना बाधित आढळून आले. हे दोघेही मुंबईतून बेकायदा प्रवास करून आले होते. याच कालावधीत सांगली आणि मिरज शहरी भागात दोन महिला कोरोना बाधित आढळून आल्या. यांचे स्ट्रेस लागायचे आहेत. 

No comments:

Post a Comment