Saturday, May 23, 2020

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सावकारांचा बंदोबस्त करू

स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे 

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 जिल्ह्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत चार दिवसापूर्वी कदमवाडी येथील शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली ,हे दुर्दैवी आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्रास देणाऱ्या सावकाराची माहिती आम्हाला कळवावी आम्ही सावकाराचां बंदोबस्त करू असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

खराडे म्हणाले, जिल्ह्यात सावकारी फोफावली आहे ही सावकारी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे अजीज शेख या सावकाराच्या त्रासाला कंटाळून कदमवाडी तालुका मिरज येथील संजय कदम यां शेतकऱ्याने आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी अजीज शेख यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली तरीही त्याच्यावर कारवाई व्हायला चार दिवस उलटले याचे कारण काय निशीचीतच यामागे पोलिसाचे पाठबळ आहे हे स्पष्ट होते.
सध्या कोरोना संकटामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे द्राक्ष बेदाणा भाजीपाला या सर्वाचे दर गडगडले आहेत  शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतीमालाची.विक्री सुरू आहे मात्र त्याला योग्य दर नाही .शेतीमाल विक्री करून घातलेला खर्चही निघत नाही अशी परिस्थिती आहे. कवडीमोल किमतीने शेतीमालाची विक्री सुरू आहे त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागवर कुऱ्हाड चालविली अनेकांनी ट्रॅक्टर ने भाजीपाला गाडून टाकला अनेकांनी फुकट शेतीमाल दिला याचाच फायदा सावकार घेत आहेत मात्र शेतकऱ्यांनी हतबल न होता जाच आणि त्रास देणाऱ्या सावकाराची आम्हाला नावे कळवा स्वाभिमानी शेतकरी संघटना संबधित सावकाराच्या बंदोबस्त नव्हे कडेलोट करू,पण शेतकरी भावांनो मामुली सावकारासाठी अनमोल जीवन संपवू नका आत्महत्या हा उपाय नाही.
बॅंका, सावकार तगादा लावत असतील तर आम्ही संबधित चां बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहोत त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांना आमचे आवाहन आहे कोणत्याही परिस्थितीत हतबल न होता संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा संकटाचा सामना निर्धार राणे करा आम्ही तुमच्या सोबत आहोत यापूर्वीही महापूर, दुष्काळ अशी अनेक संकटे आपण पाचविली आहेत कोरोनचे ही संकट  दूर होईल उद्याची पहा ट सोनेरी असणार आहे हा आशावाद बाळगा.

No comments:

Post a Comment