Wednesday, May 6, 2020

जत तालुक्यातील बेवनूर येथील सहाजण क्वारंटाईन मध्ये!

घोरपडी कनेक्शन
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
मुंबईहून कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथे मूळ गावी येणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या संपर्कात आलेला त्याचा मेहुणा आणि मेहुणाच्या घरातील अशा सहा जणांना  इन्स्टिट्यूशनल  क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे सगळे जत तालुक्यातील बेवनूर येथील आहेत. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी दिली.
मानखुर्द(मुंबई) येथे ट्रक चालक असलेली घोरपडी येथील व्यक्ती दिनांक 4 मे रोजी सकाळी इस्लामपूर येथे एका ट्रकमधून आली होती. तेथून तो जतकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरमध्ये बसला. आणि चोरोची येथे उतरला. येथे त्याने बेवणूर येथे असलेल्या आपल्या मेव्हण्याला बोलावून घेतले. येथे असलेल्या आरोग्य पथकाने संशय आल्याने तपासणी करण्यास सांगितले. त्यामुळे त्याला घरी न जाता ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून त्याला मिरजेला नेण्यात आले. येथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे त्याला तिथेच ठेवण्यात आले.
त्याच्याशी संपर्कात आलेला मेहुणा आपल्या घरी गेला होता. जतच्या प्रशासकीय पथकाने त्याला व त्याच्या कुटुंबातील सहा जणांना ताब्यात घेऊन जत येथे आणले. त्याच्यासह त्याचे आईवडील, पत्नी, दोन मुलांचा समावेश आहे. जत येथील समाज कल्याण वसतिगृहात त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची स्वेब चाचणी केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment