Sunday, June 28, 2020

मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल  विविध संघटनांच्यावतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालवण्यात आलेल्या आश्रमाशाळांच्या उभारणीपासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत राहिलेले आणि शिक्षण संस्था नावारूपाला आणतानाच संस्थेचा विस्तार करण्यात मोलाचा हातभार लावलेले श्री. कारंडे या महिन्यात आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.

हर्षवर्धन टोणे याची नवोदय विद्यालयासाठी निवड

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील वायफळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा विद्यार्थी हर्षवर्धन ज्ञानेश्वर टोणे या विद्यार्थ्याची पलूस येथील  नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याचे पालक ज्ञानेश्वर सुखदेव टोणे हे सध्या बनाळी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम पहात आहेत. मुळचे वाळेखिंडी येथील हर्षवर्धन याने नवोदय प्रवेश परीक्षा दिली होती आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे गुणवत्तेनुसार त्यास केंद्रीय नवोदय विद्यालयासाठी त्याची निवड झाली आहे.

Thursday, June 25, 2020

शरद पवारांवरील टीकेनंतर जतेत राष्ट्रवादी आक्रमक

आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध
तहसिलदारांना दिले निवेदन
जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेबद्दल केलेल्या वक्तव्यांचा जत तालुका राष्ट्रवादीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसिलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.
गोपीचंद पडळकर यांनी क24 जून रोजी प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीमध्ये बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बद्दल चुकीचे व अत्यंत खालच्या पातळीतील भाषेमध्ये वक्तव्य केले. गोपीचंद पडळकर यांनी सन 2019 विधानसभा निवडणुक बारामती मतदार संघातुन लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा अत्यंत दारुण व अपमानास्पद पराभव झाल्याने त्या पराभवाचे शल्य त्यांना आजही टोचत आहे.

पाण्यासाठी बांध, तलाव आणि प्राणवायूसाठी वृक्ष लागवडीची गरज : डॉ. राजेंद्र लवटे

सातारा,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सदृढ व निरोगी आरोग्यासाठी मानवाला स्वच्छ पाणी व शुद्ध प्राणवायूची अत्यंत गरज असते. नैसर्गिक पावसाचे पाणी वाया न घालवता ते बांध, तलाव यांची निर्मिती करून अडवणे व नैसर्गिकरित्या झाडापासून मिळणा-या प्राणवायूचा पुरवठा वाढवण्यासाठी दरवर्षी प्रत्येकाने दहा झाडे लावून आपले शरीर निरोगी ठेवावे, असे आवाहन वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले. ते सातारा येथील लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना,  वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय सेवा योजनेची पर्यावरण व जैवविविधता संरक्षण यांमधील भूमिका' या विषयावर झालेल्या 'ऑनलाईन वेबिनार'मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे होते.

Wednesday, June 24, 2020

शेगावमध्ये ४२ शेतकरी कुटूंबियांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम अडविले

नियमबाह्य काम असल्याचा आरोप
जत दि. 25 (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत-सांगोला राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. हे काम करताना नियमाप्रमाणे जमीन भूसंपादन केली नाही. मोजणी केली नाही, न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे सांगत जत तालुक्यातील बागलवाडी फाटा येथे शेगाव व मोकशेवाडी येथील ४२ शेतकरी कुटूंबियांनी काम होवू देणार नसल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्गाचे नियमबाह्य काम होवू देणार नसल्याचे सांगत आक्रमक पवित्रा काम अडविले.

बिळूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील बिळूर येथे एक जणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी दिली. मुळ बिळूरचा असलेला या रुग्णाला त्रास होऊ लागल्याने त्याच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची प्रकृत्ती बिघडल्याने त्याला सांगली येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

Friday, June 19, 2020

राज्यातील केंद्रप्रमुखांच्या 2 हजार 200 जागा रिक्त

रिक्त जागांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम 
● शिक्षकांना पदोन्नती द्या 
●आर्थिक भुर्दंड बसणार नाही.
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 जिल्हा परिषदांतर्गत शिक्षण विभागाचे वरिष्ठ कार्यालय आणि शाळा यांच्यातील दुवा म्हणून शासनाने निर्माण केलेल्या केंद्रप्रमुखांच्या भरती, पदोन्नतीकडे दुर्लक्ष केल्याने आजमितीस राज्यात केंद्रमप्रमुखांची 2 हजार 200 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी ठरलेल्या धोरणानुसार ना परिक्षा झाली,ना भरती आणि पदोन्नती. यामुळे असलेल्या केंद्रप्रमुखांवर अतिरिक्त भार असून शासनाने याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे सांगली जिल्हा कास्ट्राईब संघटनेचे कार्याध्यक्ष लखन होनमोरे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सविस्तर निवेदन देत वस्तुस्थिती अवगत केली आहे.

जिल्ह्यात 5511 मे.टन खत व 2406 क्विंटल बियाणांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप

महाबीज व खाजगी कंपन्या मार्फत 23 हजार 580 क्विंटल बियाण्याचा पुरवठा  - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी
● बियाणे व खताची उपलब्धता मुबलक प्रमाणात
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यासाठी आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गट, शेतकरी मित्र, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप करण्यात येत आहे. दि. 6 जून अखेर 5511 मे. टन खत व 2406 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात बियाणे व खताची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

Thursday, June 18, 2020

जत- घाटगेवाडी प्रधानमंत्री रस्त्याची दुरावस्था

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या जत-घाटगेवाडी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली असून वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.

बीडच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी तुषार ठोंबरे यांची नियुक्ती

बीड,(जत न्यूज वृत्तसेवा)-
बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर तुषार एकनाथ ठोंबरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कोल्हापूर या पदावरून पदोन्नतीने बीड येथे बदली झाली आहे. पुणे विद्यापीठातून बीए अर्थशास्त्र व विधी शाखेतील पदवी संपादन करून 2001 साली सरळसेवा भरतीने उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली होती. 1962 पासूनचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा  सर्वाधिक गुणांचा उच्चांक मोडून महाराष्ट्रात सर्वप्रथम आले.

जतमधील गुंड राहुल काळे याचा संशयास्पद मृत्यू

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड राहुल काळे याचा संशयास्पद बुधवारी रात्री मृत्यु झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.  पोलिस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आशिर्वाद क्लासेस जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. राहुल काळे व त्याचे दोन मित्र आंबे काढण्यासाठी गेले होते. भिंतीवरून उडी मारताना राहुल काळे याच्या पाठीचा मणका मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असे जत पोलिसांकडून सांगण्यात आले.

उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांची 350 वर पदे रिक्त

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
राज्यात उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची 350 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. परिणामी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर प्रशासकीय व शासनाच्या विविध योजना राबविताना प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट 'ब' उपशिक्षणाधिकारी व इतर तत्सम पदांच्या रिक्त 123 जागा भरण्यासाठी 17 मे 2017 रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांना डावलण्यात आले होते. न्यायालयाच्या परवानगीने प्राथमिक शिक्षकांनी 13 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दिली. ही परीक्षा घेऊन दोन वर्ष दहा महिन्याचा कालावधी होऊनही अद्यापही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल लावला नाही.

अंकलगी येथे डिझेल -पेट्रोल पंपाचे खासदार पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
अंकलगी (ता. जत) येथे जमदाडे यांनी सुरू केलेल्या शिवनेरी किसान सेवा केंद्र संचलित डिझेल- पेट्रोल पंपाचे उद्घाटन खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे उपस्थित होते. 
  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन देशातील अग्रगण्य कंपनी आहे.ग्रामीण भागातील जनतेला शिवनेरी किसान सेवा केंद्राच्या माध्यमातून जमदाडे कुटुंबीयांनी चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे, या दर्जेदार सेवेचा लाभ घ्यावा. अंकलगी व जवळपासच्या गावांना डिझेल- पेट्रोल साठी इतरत्र जावे लागत होते, परंतु या सेवा केंद्राच्या माध्यमातून चांगली सेवा मिळणार आहे. असे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले.

जतच्या सहाय्यक गटविकास आधिकारी शिंदे यांचा सत्कार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदी देवनाळ गावचे सुपुत्र संजय शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिराजदार यांनी त्याचा सत्कार केला. संजय शिंदे हे जत तालुक्यातील देवनाळ येथील सुपुत्र असून त्यांना जत गटविकास अधिकारी अतिरिक्त कारभार सोपिवण्यात आला आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय शिंदे म्हणाले की, मी जत तालूक्यातला असल्याने जत विषयी आदर आहे.

Wednesday, June 17, 2020

उमदीचे गणेश बागडे 'कोरोना योद्धा'ने सन्मानित

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील उमदी येथील 'दैनिक जनमत 'चे विशेष प्रतिनिधी गणेश बागडे यांना 'कोरोना योद्धा' म्हणून पुरस्कार सोलापूरच्या सोलापूर युथ फाऊंडेशनकडून गौरवण्यात आले आहे.  देशभरात कोरोना विषाणूंने गेल्या दोन महिन्यापासून थैमान घातल्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीमध्ये होता या संकटाच्या काळामध्ये जत तालुक्यातील प्रशासनाचे आदेश व माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे काम व सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडविण्याचे काम गणेश बागडे यांनी केले.

Monday, June 15, 2020

उटगीतील अतिक्रमण हटविण्याची सरपंचांनी मागणी

सोन्याळ, (जत न्यूज वृत्तसेवा)-
उटगी येथील गायरान भागातील सर्वे नं २ मधील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी उटगी सरपंच भिमाण्णा बिराजदार यांनी केली आहे.  जत तालुक्यातील उटगी येथील सरकारी हद्दीतील गायरान सर्वे नं २ मध्ये रोजगार हमी योजनेअंर्तगत ग्रामपंचायत उटगी मार्फत सात वर्षापूर्वी वृक्षलागवड केलेली आहे तसेच नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प , मैदानासाठी राखीव ठेवलेली खुली जागा, नियोजित पाण्याची टाकी बांधण्याची जागा याच परिसरात आहे गावातीलच अनेक नागरिकांनी गायरान जागेत अवैधरीत्या अतिक्रमण करून घराचे बांधकाम करत आहेत.

गठई कामगांराना सरकारने मदत करावी : उपसभापती विष्णू चव्हाण

सोन्याळ, (जत न्यूज वृत्तसेवा)- 
महाराष्ट्रात सुमारे १० लाखाहून अधिक चर्मकार समाज बांधव आहेत. यामध्ये मोठया प्रमाणात गठई कामगार आहेत, कोरोना लॉकलाऊनमुळे गठई कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने सर्व क्षेत्रात मदत दिली आहे. मात्र चर्मकार समाजाला कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ गठई कामगारांना अर्थिक मदत द्यावी तसेच पुन्हा संसाराचा गाडा उभा करण्यासाठी संत रोहीदास महामंडळाकडुन कर्ज उपलब्ध करुन दयावे, अशी मागणी जत पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांनी केली आहे.

Saturday, June 13, 2020

भारतीय जनता पक्षाच्यावतीने जत कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक किटचे वाटप

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
 कोरोना महामारीच्या काळात इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते कंटेन्मेंट झोन मधील सैनिकनगर येथील गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

Thursday, June 11, 2020

मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्या-बाळासाहेब बंडगर

शेकडा दहा टक्के कमिशनदेखील द्या
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बंडगर यांनी केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने ज्या प्रमाणे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण कवच दिले आहे, त्याच प्रमाणे राज्य सरकारने राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण कवच दिले पाहिजे.

Tuesday, June 9, 2020

उमदीत मावा कारखान्यावर पोलिसांचा छापा

53 हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

जत (जत न्यूज वृत्तसेवा) -
जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उमदी ते सलगर या डांबरी मार्गालगत सुमारे 2 किमी अंतरावर दक्षिणेस असलेल्या पत्रा शेडमध्ये बेकायदेशीररीत्या सुपारी, तंबाखू व चुना यांचा वापर करून मशीनद्वारे त्याचा मावा  बनवण्याच्या कारखान्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पात्र मागासवर्गीय शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती द्या

सांगली जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून विविध कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने  केंद्रीय शाळांतील केंद्रप्रमुखांची पदे नव्याने भरती  करण्यात आली नसल्याने  राज्यात आजअखेर मराठी, उर्दू, कन्नड, व इतर माध्यमाच्या ४६% हुन अधिक जागा रिक्त आहेत.परिणामी एका-एका केंद्रप्रमुखाला दोन-ते तीन केंद्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच मागासवर्गीय शिक्षकांनाही न्यायालयीन आणि प्रशासकीय विविध कारणे पुढे करत केंद्रप्रमुखांची संभाव्य पदोन्नतीपासून दूर ठेवल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.

Monday, June 8, 2020

सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी, वीज बिल, मालमत्ताकर माफ करा: श्रीकांत सोनवणे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
 कोरोना लॉकडाउनचा फटका सर्वसामान्य गरीब वर्गाला बसला असून, लॉकडाउन क्रलावधीत सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली, सर्वात जास्त फटका गरीब व सर्वसामान्य नागरिकांना बसला. त्यांना आता आधार म्हणून वीज बिल व घरपट्टी कराची रक्कम माफ करावी, अशी मागणी जत येथील सामाजिक कार्यकर्ते व जतचे भावी नगरसेवक श्रीकांत सोनवणे यांनी  राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

Saturday, June 6, 2020

प्रा. श्रीमंत ठोंबरे व प्रयोगशाळा सहायक सुरेश पुजारी सेवेतून निवृत्त

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 शिक्षणातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असतो.  विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, संस्कार, नितीमुल्य  आणि स्वावलंबन  बिंबविण्याचे  काम शिक्षक करीत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे एक प्रचंड उर्जा. हेच ते वय की जेथे त्याचे पुढील आयुष्य कसे असणार ते ठरणार असते. अलीकडील शिक्षण क्षेत्रातील वातावरण बदलत जात असले तरी काही शिक्षक आपले कार्य निष्ठेने आणि समर्पित भावनेने व व्यक्तिगत लाभ किंवा हानीचा विचार न करता ज्ञानदानाचे कार्य मन लावून करताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. श्रीमंत ठोंबरे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले.

Friday, June 5, 2020

शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज: प्राचार्य डाॅ. युवराज भोसले

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
शाश्वत विकास हा  मानवाच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांची प्रतीपूर्ती करतो. पर्यावरण व जैवविविधतेचे  संरक्षण करणारा शाश्वत विकास ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था (कोल्हापूर)चे प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ. युवराज भोसले यांनी केले. ते  जत येथील राजे रामराव महाविद्यालयामधील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन-२०२० निमित्त आयोजीत "शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधता" या दि. ४ व ५ जून या दोन दिवसीय पहिल्या आॅनलाईन परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डाॅ. विठ्ठल ढेकळे होते.

जतमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

आजपासून चार दिवस दुकाने बंद
जत(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरातील शेगाव रोडला राहणाऱ्या व खलाटी येथील रुग्णाच्या संपर्कातील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जतेत खळबळ उडाली आहे. जत शहरातील हा पहिला रुग्ण आहे. खलाटीतील रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे स्वाब गुरूवारी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य चार जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधित व्यक्ती ट्रॅव्हलवर चालक होता. तर खलाटीतील कोरोना बाधित व्यक्ती त्याचा मदतनीस म्हणून काम करत होता.

Thursday, June 4, 2020

नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वारेमाप होत चालल्याने पर्यावरण व जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात- प्राचार्य डाॅ. शेजवळ

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
पृथ्वीतलावर सर्वात हुशार व संवेदनशील असणारा माणूस आत्मकेंद्री होऊन भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्याच्या अंगी वाढत चाललेली क्रुरता, अतिरेकीपणा यामुळे नैसर्गिक स्त्रोतांचा वापर  वारेमाप होत चालला आहे. यामुळे पर्यावरण व जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे (कोल्हापूर)चे अर्थ सहसचिव प्राचार्य डाॅ. राजेंद्र शेजवळ यांनी केले. ते जत येथील राजे रामराव महाविद्यालयमधील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजीत "शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधता" या दि. ४ व ५ जून या दोन दिवसीय पहिल्या आॅनलाईन परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ. विठ्ठल ढेकळे होते.

शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करा-श्रेयस नाईक

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये.  तसेच आता खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणीसाठी खते, बियाणे, औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे. कोरोना व्हायरस मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडली आहे.

येळवीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात

ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्थेचा पुढाकार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्यावतीने जतचे तहसिलदार सचिन पाटील व गटविकास अधिकारी श्री. धरणगुत्तीकर यांना रोजगार हमीचे काम चालू करण्याबाबतचे निवेदन दिले होते त्याचा पाठपुरावा करत आज रोजगार हमीचे काम येळवी येथे वन विभागामार्फत आणि कृषि विभागामार्फत सुरू झाले आहे. कामाची सुरुवात येळवीचे सरपंच विजय कुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी,  संस्थेचे सचिव तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, कृषी सहाय्यक विठ्ठल राख,जत कृषी विभाग आत्माचे प्रमुख रविकिरण पवार, वनखात्याचे वनपाल एस. एस. मुजावर, राजू कदम, तुकाराम सुतार, बजरंग चव्हाण, ज्ञानेश्वर माने, नवनाथ तेरवे,चंद्रकांत खंडागळे, ग्राम रोजगार सेवक राजु रूपनुर, वनरक्षक सचिन वगरे, किरण जाधव, पांडुरंग व्हनमाने तसेच सर्व मजुरांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात करण्यात आली.

अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका - विजय ताड

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरात नगरपरिषदेच्या वतीने चालू विविध विकास कामे चालू आहेत.यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. ही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, तसेच काम दर्जाहीन व निकृष्ट आहे. आशा निकृष्ट व दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना लवकरच भेटणार असल्याची माहिती जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी दिली.

Wednesday, June 3, 2020

राजे रामराव महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
येथील राजे रामराव महाविद्यालयामधील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. ४ व ५ जून, २०२० रोजी दोन दिवसीय "एन्वायरमेंट अॅंन्ड बायोडायवरसिटी फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट" या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजीत करण्यात आल्याची माहिती संयोजक डाॅ. राजेंद्र लवटे यांनी दिली.