Wednesday, June 3, 2020

राजे रामराव महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
येथील राजे रामराव महाविद्यालयामधील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. ४ व ५ जून, २०२० रोजी दोन दिवसीय "एन्वायरमेंट अॅंन्ड बायोडायवरसिटी फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट" या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजीत करण्यात आल्याची माहिती संयोजक डाॅ. राजेंद्र लवटे यांनी दिली.

      या आॅनलाईन परिषदेचे उद्घाटन दि. ४ जून रोजी स. १० वा. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे अर्थ विभागाचे सहसचिव प्राचार्य, डाॅ. राजेंद्र शेजवळ यांचे हस्ते तर समारोप समारंभ दि. ५ जून रोजी दु. २ वा. संस्थेच्या प्रशासन विभागाचे सहसचिव प्राचार्य, डाॅ. युवराज भोसले यांच्या हस्ते होणार आहे. सदर दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजे रामराव महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डाॅ. व्ही.एस. ढेकळे हे भुषवणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेस देशातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील ३०० प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी नावनोंदणी केली असून पर्यावरण, जैवविविधता, शाश्वत विकास या क्षेत्रातील ताज्या संशोधनावर चर्चा होणार आहे. ६० संशोधकांच्या संशोधन पत्रिकांचा गोषवारा प्रसिध्द केला जाणार असून संशोधन पत्रिका जर्नल मध्ये प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
या परिषदेत पुढीलप्रमाणे सहा बीजभाषणे होणार आहेत. दि. ४ जून. २०२० वेळ, वक्ता,  विषय असे-
१) स. ११ वा. : प्रा. ए. पालावासम (मनोमनीयन सुंदरनार विद्यापीठ, तिरूनेलवेली) -"एन्वायर्नमेंटल स्टेटस अॅण्ड इश्यूज वीथ रिस्पेक्ट टू एश्चूरीज इन साऊथ इस्ट कोस्ट आॅफ इंडिया"
२) दु. १२ वा. प्रा. डाॅ. डॅनिएल मीझ (राजीव गांधी विद्यापीठ, दोईमुख, ईटानगर, अरूणाचल प्रदेश)- "टेक्नाॅलाॅजी टू स्टडी द बर्डस मुव्हमेंट".
३) दु. १ वा. प्रा. डाॅ. देवू भांगे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)- "रोल आॅफ केमिस्ट्री फाॅर बल्क साॅलीड वेस्ट मॅनेजमेंट: प्रेझेंटेशन आॅफ फ्यू केसेस"
दि. ५ जून, २०२०-१) स. १० वा. प्रा. डाॅ. अफरोज आलम (बनस्थळी विद्यापीठ, राजस्थान)- "क्वालिटी पब्लीकेशन इन इंडीयन बायोडायवरसिटी"
२) स.११ वा. प्रा. डाॅ. राणी भगत (बापूजी घोलप काॅलेज, सांगवी-पूणे)- "फ्लोरिस्टीक स्टडीज अॅण्ड इंम्पॅक्ट अनॅलिसीस इन मुळशी वाॅटरशेड कॅचमेंट एरिया, नार्दर्न-वेस्टर्न घाट"
३) दु. १२ वा. प्रा. डाॅ. योगेश कोळी (संत राऊळ महाराज काॅलेज, कुडाळ-सिंधूदुर्ग)- "बर्ड लाईफ आॅफ सिंधूदुर्ग"
     ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. महादेव करेन्नावर, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. दिपक कुंभार, डाॅ. शिवाजी कुलाळ, प्रा. मल्लाप्पा सज्जन, डाॅ. विजय जाधव, प्रा. अभय पाटील, प्रा. गोविंद साळुंखे, डाॅ. सचिन दांगट, प्रा. कु. विद्या माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. तरी सदर आॅनलाईन परिषदेत जत तालुक्यातील पालक-विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

No comments:

Post a Comment