Thursday, June 11, 2020

मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्या-बाळासाहेब बंडगर

शेकडा दहा टक्के कमिशनदेखील द्या
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बंडगर यांनी केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने ज्या प्रमाणे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण कवच दिले आहे, त्याच प्रमाणे राज्य सरकारने राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाख रूपयांचे विमा संरक्षण कवच दिले पाहिजे.
कोरोना या महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुद्रांक विक्रेते हे आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून तहसिल कार्यालय आवारातील दुय्यम निबंधक कार्यालय आवारात मुद्रांक विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मुद्रांक विक्रेते यांना शंभर रूपये व पाचशे रूपये पर्यंतचे जनरल मुद्रांक विक्री करता येतात. पाचशे रूपयांच्या पुढील मुद्रांक विक्री सद्या राज्य सरकारने बंद ठेवली आहे. पाचशे रूपयांच्या पुढील मुद्रांकासाठची रक्कम  नोंदणी विभागाने राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये ई चलनाने भरणेची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे मुद्रांक विक्रेते यांच्याकडे केवळ किरकोळ स्टॅम्प विक्री करण्याची वेळ आली आहे. मुद्रांक विक्रेते यांना शेकडा तीन टक्के ईतके अल्प कमीशन आहे. त्यातच मुद्रांक विक्री रजिस्टर  व विक्री साठी लागणारे साहित्य, ऑफीस भाडे, लाईट बिल हे सर्व या कमीशन मधूनच करावे लागत आहे. मुद्रांक विक्रेते यांना महिन्याला चार हजार रूपये एवढे सरासरी कमीशन मिळत असून यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा भागवायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे.
  मुद्रांक विक्रेते यांना शेकडा दहा टक्के कमिशन देण्यात यावे ही आमच्या संघटनेची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्यातील मुद्रांक विक्रेते यांनी राज्यस्तरावर मोठे आंदोलन ही केले होते. त्यावेळी शासनाने मुद्रांक विक्रेते यांना दहा टक्के कमिशन देण्याचा आमचा विचार असल्याची चर्चा ही मुद्रांक विक्रेते यांच्या शिष्टमंडळाबरोबर केली होती. परंतु पुढे काहीच हलचाल प्रशासनाने केली नाही. ही दुदुर्दैवाची गोष्ट आहे.
  कोरोनाचे पार्श्वभूमी वर राज्यसरकारने ज्या प्रमाणे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांचा ज्या प्रमाणे प्रत्यक्षात जनतेशी थेट संबंध येतो. व त्या सबंधातूनच कोरोना सारखी महामारीची बाधा त्यांना होत आहे. त्या प्रमाणेच राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांचा थेट संबंध हा जनतेशी जोडण्यात आलेला आहे. ग्राहकांना शंभर रूपये व पाचशे रूपयेचे मुद्रांकाची विक्री करताना त्यांनी कितीही दक्षता घेतली तरीही त्यांचा संपर्क हा ग्राहकाशी झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना कोरोनाचे पार्श्वभूमीवर ५०लाख रूपयांचे विमा संरक्षण कवच द्यावे, असे ही श्री. बंडगर यानी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment