Saturday, June 13, 2020

भारतीय जनता पक्षाच्यावतीने जत कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक किटचे वाटप

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
 कोरोना महामारीच्या काळात इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते कंटेन्मेंट झोन मधील सैनिकनगर येथील गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी परशुराम नागरगोजे, किसन मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चिवटे, माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील, जत तालुका भाजप तालुकाध्यक्ष सुनील पवार, नगरसेवक उमेश सावंत, प्रमोद हिरवे, प्रकाश माने, जत पंचायत समिती उपसभापती विष्णू चव्हाण, प्रभाकर भाऊ जाधव, बसवराज चव्हाण, संतोष मोटे,किरण मामा शिंदे, अनिल पारसे उपस्थित होते.
कोरोनामूळे असमाधान कारक क्षेत्र म्हणून जतचा सैनिकनगर क्षेत्र जाहीर झाला आहे. येथील लोकांचे हाल होत असल्याने नगरसेवक ताड यांनी मदत करण्याचे सुचविले. त्यानुसार याठिकाणी मदत देण्यात आली. खलाटी येथील कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या जत येथील सैनिक नगर ट्रॅव्हल्स ड्रायव्हर व त्याची आई ला कोरोनाचा लागण झाली होती त्यामुळे सैनिकनगर परिसराला काँटोमेन्ट झोन परिसर म्हणून घोषित केला होता. त्यामुळे येथील नागरिकांना बाहेर कुठेही जाता येत नव्हते.गरीब व गरजू व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने माणुसकी म्हणून ४० कुटुंबाना जीवनावश्यक किट वाटप केले. या किट मध्ये १० किलो तांदूळ,५ किलो ज्वारीचे पिठ,१ किलो तूर डाळ, तेल साबण,साखर, चहा पावडर, कोलगेट असे वस्तूंचे किट तयार करून वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment