Monday, June 15, 2020

गठई कामगांराना सरकारने मदत करावी : उपसभापती विष्णू चव्हाण

सोन्याळ, (जत न्यूज वृत्तसेवा)- 
महाराष्ट्रात सुमारे १० लाखाहून अधिक चर्मकार समाज बांधव आहेत. यामध्ये मोठया प्रमाणात गठई कामगार आहेत, कोरोना लॉकलाऊनमुळे गठई कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने सर्व क्षेत्रात मदत दिली आहे. मात्र चर्मकार समाजाला कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ गठई कामगारांना अर्थिक मदत द्यावी तसेच पुन्हा संसाराचा गाडा उभा करण्यासाठी संत रोहीदास महामंडळाकडुन कर्ज उपलब्ध करुन दयावे, अशी मागणी जत पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यापासुन लॉकलाऊन असल्याने सर्व व्यवसाय बंद व्यवसाय ठेवण्यात आले आहेत. राज्यात इतक्या मोठया प्रमाणात चर्मकार समाज आहे. त्यातील सुमारे अडीच लाख गठई कामगार तर ५० हजार कारागार व सुमारे १ लाख चप्पलं विक्री दुकानदार आहेत. कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद झाला असून आता चर्मकार
सामाज्याची उपासमार होत आहे. त्यामुळे सरकार गेल्या पंधरा दिवसापासुन सर्व क्षेत्राना मदत करीत आहे. मात्र चर्मकार समाज्यासाठी विशेष कोणत्याही अर्थिक पॅकेजची घोषणा केली नाही. त्यामुळे तात्काळ राज्यातील गठई कामगाराना अर्थिक मदत दयावी, अशी मागणी उपसभापती विष्णू चव्हाण यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment