Wednesday, June 17, 2020

उमदीचे गणेश बागडे 'कोरोना योद्धा'ने सन्मानित

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील उमदी येथील 'दैनिक जनमत 'चे विशेष प्रतिनिधी गणेश बागडे यांना 'कोरोना योद्धा' म्हणून पुरस्कार सोलापूरच्या सोलापूर युथ फाऊंडेशनकडून गौरवण्यात आले आहे.  देशभरात कोरोना विषाणूंने गेल्या दोन महिन्यापासून थैमान घातल्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीमध्ये होता या संकटाच्या काळामध्ये जत तालुक्यातील प्रशासनाचे आदेश व माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे काम व सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडविण्याचे काम गणेश बागडे यांनी केले.
सध्या ते 'आपला माणूस' पोलिस मित्र संस्थेचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून व आखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहात आहेत. जत तालुक्यातील उमदी येथे लॉकडाऊनमध्ये 24 तास राबणा-या पोलिसांना नाष्टा व जेवणाची सोय केली होती. तसेच गरीब लोकांना हात मोजे, डेटॉल साबण, सॅनिटायझर आदी वस्तू पुरविल्या. त्याच बरोबर गरीब लोकांच्या अन्न धान्य व जीवनावश्यक गरजा भागविल्या होत्या. शासन व प्रशासन दरबारी मांडून यांना न्याय देण्याचे काम वृत्तपत्रातून केले होते. याचीच दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण चाबूकस्वार यांनी सोलापूर युथ फाऊंडेशनच्यावतीने 'कोरोना योद्धा' म्हणून पत्रकार गणेश बागडे यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

No comments:

Post a Comment