Thursday, June 18, 2020

जतच्या सहाय्यक गटविकास आधिकारी शिंदे यांचा सत्कार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदी देवनाळ गावचे सुपुत्र संजय शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिराजदार यांनी त्याचा सत्कार केला. संजय शिंदे हे जत तालुक्यातील देवनाळ येथील सुपुत्र असून त्यांना जत गटविकास अधिकारी अतिरिक्त कारभार सोपिवण्यात आला आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय शिंदे म्हणाले की, मी जत तालूक्यातला असल्याने जत विषयी आदर आहे.
शासनाच्या योजना तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न सहाय्यक पदाचा चांगला उपयोग करू, असे यावेळी संजय शिंदे बोलताना म्हणाले. तर यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिराजदार म्हणाले की, संजय शिंदे हे जत तालुक्याचे सुपुत्र असून त्याच्याकडे जत पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार सोपवण्यात आल्यामुळे तालुक्यातील शेतक-र्यांचा फायदा होणार असून शासनाच्या योजना तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिराजदार यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment