Wednesday, June 24, 2020

शेगावमध्ये ४२ शेतकरी कुटूंबियांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम अडविले

नियमबाह्य काम असल्याचा आरोप
जत दि. 25 (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत-सांगोला राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. हे काम करताना नियमाप्रमाणे जमीन भूसंपादन केली नाही. मोजणी केली नाही, न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे सांगत जत तालुक्यातील बागलवाडी फाटा येथे शेगाव व मोकशेवाडी येथील ४२ शेतकरी कुटूंबियांनी काम होवू देणार नसल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्गाचे नियमबाह्य काम होवू देणार नसल्याचे सांगत आक्रमक पवित्रा काम अडविले.

शेतक-्यांनी काम अडविल्याचे कळताच प्रशासनही मोठा पोलीस फौजफाटा घेवून हजर झाले व शेतकरी व प्रशासन यांच्यात चार तास वाकययुद्धाचा खेळ सुरू होता. प्रशासन शैतक-्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हते काम सुरूच करणार असा त्यांचा हेका सुरूच होता. अखेर भाजपचे नेते, अरजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी शेतकरयांची बाजू घेत अधिकार्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. यावेळी प्रभाकर जाधव, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. नियमाने कामे करा असा पवित्रा अखेरपर्यंत प्रभाकर जाधव व त्या ४२ शेतकरयांच्या कुटूंबियांनी घेतला. यावेळी सरपंच धोंडीराम माने, सरपंच अण्णासाहेब गायकवाड, अॅड. चंद्रकांत शिंदे, अॅड. रामचंद्र शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. हा वाद वाढत चालला. अखेर प्रशासन व शेतकरी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोघांनीही दोन पावले मागे घेण्यास एकमत झाले. माती कामे व अन्य किरकोळ कामे करावीत, येत्या पंधरा दिवसात न्यायालय काय निकाल देते त्यानुसार कामे करण्याचे ठरले. प्रांताधिकारी प्रशांत आवटे व प्रभाकर जाधव यांनी ही यावर एकमत दर्शविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, जत पोलिसांनी या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी दक्षता पथक बोलावून 250 ते 300 पोलिसांचा फौजफाटा मागवून कायदा व सुव्यवस्था मोडीत काढण्यात आला. अगोदर जमीन संपादित करून कामे सुरू करा, यासाठी हे आंदोलन असल्याचे प्रभाकर जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment