Friday, June 5, 2020

जतमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

आजपासून चार दिवस दुकाने बंद
जत(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत शहरातील शेगाव रोडला राहणाऱ्या व खलाटी येथील रुग्णाच्या संपर्कातील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जतेत खळबळ उडाली आहे. जत शहरातील हा पहिला रुग्ण आहे. खलाटीतील रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे स्वाब गुरूवारी तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य चार जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधित व्यक्ती ट्रॅव्हलवर चालक होता. तर खलाटीतील कोरोना बाधित व्यक्ती त्याचा मदतनीस म्हणून काम करत होता.
चालक व मदतनीस यांनी कोलकता येथे प्रवास केला होता. तेथून आल्यानंतर जत शहरात तो फिरल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जत शहरात कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण सापडल्याने जत शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी चर्चा करून संपूर्ण प्रशासकीय विभागांना सहकार्य करण्यासाठी शनिवार दि. ६ जून २०२० ते मंगळवार दि. ०९ जून २०२० अखेर स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय  व्यापा-र्यांनी घेतलेला आहे. सदर बंद मधून खालील आस्थापना वगळण्यात आलेल्या आहेत.दवाखाने - २४ तास चालू, मेडीकल - सकाळी ९ ते सायं. ७ पर्यंत चालू, खत दुकान - सकाळी ९ ते दु. २ चालू, दुग्धालय - सकाळी ६ ते १०, सायं. ५ ते रात्री ८ संकलन व विक्री चालू, होलसेल किराणा - रात्री ८ ते रात्री ११ (गाडी भरणे व उतरविणे व होलसेल विक्री) या आस्थापना वगळून उर्वरीत सर्व आस्थापना दि. ०६ जून २०२० ते दि. ०९ जून २०२०अखेर बंद राहणार आहेत.

No comments:

Post a Comment